परस्परविरोधी तक्रारी; 13 जणांवर गुन्हा
शिरुरकासार । वार्ताहर
शेतात बोअर घेताना त्यातून उडणारी माती पिकांवर पडत असल्याच्या कारणावरुन दोन गट समोरासमोर आले. एकमेकांना शिवीगाळ करत लोखंडी राड, दगड, कुर्हाड व काठीने मारहाण केली गेली. बुधवारी (दि.13) तालुक्यातील बावी शिवारात ही घटना घडली. परस्परविरोधी तक्रारीवरुन 13 जणांवर शिरुर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
बळीराम अर्जुन खेडकर (34) यांच्या तक्रारीनुसार, 10 मे रोजी आरोपी शेतातील बांधावर बोअर घेत होते. बोअरमधून पडणारी मातील बळीराम यांच्या शेतातील भुईमुगाच्या पिकावर उडून येत होती. याची विचारणा करण्यासाठी ते गेले असता त्यांना व कृष्णा खेडकर यांच्या डोक्यात कुर्हाड मारुन लोखंडी रॉड मारु दुखापत केली. यावरुन विठ्ठल शामराव मोरे, शामराव त्रिंबक मोरे, बाबु शहादेव मोरे, अविनाश शहादेव मोरे, सचिन शामराव मोरे, बाळू शहादेव मोरे (सर्व रा.बावी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
बुधवारी (दि.13) विठ्ठल शामराव मोरे (32) यांनीही तक्रार दिली. ‘तू शेतात बोअर घ्यायचा नाही, तुझ्या बोअरचा फुफाटा आमच्या शेतात येतो’ म्हणत आरोपींनी शिवीगाळ केली.नंतर आरोपींनी घरात घुसून विठ्ठल यांच्यासह त्यांचे वडिल भाऊ व पुतण्या यांना लोखंडी रॉड, दगड व काठीने मारहाण करत गळ्यातील सोनसाखळी बळजबरीने काढून घेतली. यावरुन बळीराम अर्जुन खेडकर, महादेव शामराव खेडकर, किसन अर्जुन खेडकर, विठ्ठल महादेव खेडकर, दिलीप ढाकणे, महेश दिलीप खेडकर व गोकुळ दिलीप खेडकर यांच्यावर शिरुर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दोन्ही प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक पवार करत आहेत.
Leave a comment