अंथरवणपिंप्रीतील घटना; पोलीसांकडून सौम्य बळाचा वापर

सहा जणांवर गुन्हा

पिंपळनेर । वार्ताहर

संचारबंदीदरम्यान सुरु असलेल्या हातभट्टी दारुअड्ड्यावर कारवाई करताना पिंपळनेर पोलीसांनी एका दारुविक्रेत्यास ताब्यात घेतले. मात्र त्याला सोडा म्हणत त्याच्या साथीदारांनी पोलीसांवरच धावून जात त्यांच्याशी झोंबाझोंबी करत शासकीय कामात अडथळा आणून हुज्जत घातली. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी सौम्य बळाचा वापर केला.मंगळवारी (दि.12) अंथरवणपिंप्री तांडा येथे साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. सहा जणांवर गुन्हा दाखल झाला.

राजु छगन राठोड, यशोदा विठ्ठल राठोड, सविता रविंद्र राठोड, बायणाबाई छगन राठोड, अनिता राजु राठोड व छगन शाम राठोड यांचा आरोपीत समावेश आहे. अंथरवणपिंप्री तांडा येथे हातभट्टी दारु तयार करुन तिची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी पिंपळनेर ठाण्याचे पोलीस कर्मचारी तिथे पोहचले. कारवाईदरम्यान पोलीसांनी छगन शाम राठोड यास ताब्यात घेतले. यावेळी ‘आमची दारु का पकडता? छगन यास सोडा’ म्हणत महिला-पुरुष पोलीसांच्या अंगावर धावून जात त्यांच्याशी हुज्जत घालत शासकीय कामकाजात अडथळा आणला. दरम्यान यावेळी जमाव जमला. लोकांना निघून जावे असे तोंडी आदेश सहाय्यक निरीक्षक शरद भुतेकर यांनी दिले मात्र तरीही जमाव पांगला नाही, अखेर पोलीसांनी सौम्य बळाचा वापर करत स्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी सहा जणांवर शासकीय कामात अडथळा, मुंबई दारुबंदी कायदा व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल झाला.उपनिरीक्षक सानप तपास करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.