परळी । वार्ताहर
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र अतिशय सतर्कता घेतली जात आहे. ठिकठिकाणी तपासणी करून व बाहेर फिरण्याची कारणे जाणून घेतल्यानंतरच चेकपोस्ट वरुन सोडले जाते.परंतु चेकपोस्ट चुकविण्यासाठी काही जण नामी शक्कल लढवून प्रशासनाला हुलकावणी देत आहेत.असाच एक प्रकार परळीतील एका रस्त्यावर जात असतांना उघडकीस आला आहे. दुचाकीवरुन वरून आठ पोते घेऊन जाणार्या एकाला पोलीसांनी अडवले तेंव्हा पोत्यात गावरान तंबाखू आढळून आली. प्रशासनाला हुलकावणी देउ पहाणार्या एकाला पोलीसांनी पकडले असून त्याच्यावर कारवाई केली आहे.
परळी शहरातील संभाजीनगर हद्दीत आरोपी शेख वसीम शेख नसीर (26 रा. काकर मोहल्ला) हा दुचाकीवरुन (क्र. एम एच 24 बीए 9373) आठ पांढरे भरलेले पोते वाहतूक करताना आढळून आला.पोलीस कर्मचार्यांनी दुचाकीवरून निघालेल्या या युवकाला थांबवले व काम काय आहे ? विचारणा केली. तेंव्हा तंबाखू असुन विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे कबूल केले.एरवी ही तंबाखूप 500 रुपये किलो प्रमाणे विक्री केल्या जाते मात्र या लॉक डाऊन च्या काळात याचा भाव आकाशाला भिडला असून 4000 प्रति कोली प्रमाणे काळ्या बाजारात तंबाखूची विक्री केल्या जात आहे.पकडलेल्या तंबाखूची सध्या अंदाजे किंमत ही 2 लाख 80 हजार होते. या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय चांद मेंडके, पो. ना.सचिन सानप, पो.ना.बाबासाहेब आचार्य यांनी कारवाई केली तपास.ए.स.आय. आईटवार हे करत आहेत.
-------
Leave a comment