चौसाळा | वार्ताहर

चौसाळा नगरीचे सरपंच मधुकर भाऊ तोडकर यांच्या पुतनीचा विवाह  दि.14/05/20 रोज गुरुवार रोजी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अगदीच साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडला. 

वैशाख- जेष्ठ महिना आला की दरवर्षी लग्न विधी पार पडत असतात.  उपवर वधू यांच्या लग्नाच्या तिथी ,सोयरिकीच्या कार्यक्रमांची रेलचेल अगदी प्रत्येक जाती धर्मात अगदी जोमात चालू असते. रबी पिकांची काढणीनंतर खरा खुरा हंगाम असतो तो म्हणजे लग्न ,जागरण गोंधळ, विविध सामाजिक उपक्रमांची गोळा बेरीज होत असते. यातून काही जण आघावू खर्चाल फाटा देत सामूहिक विवाह सोहळे पार पाडत असतात. त्यातच  वधू पित्याला आपल्या मुलींच्या लग्नाची वर पित्याप्रमाणे हौस ही मोठी असते. पण कोरोनाचा जागतिक वाढता संसर्ग पाहता आजकाल सगळीकडे रजिस्टर नोंदणी विवाहाची त्याचबरोबर अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित लग्न सोहळे पार पडत आहेत हे खरोखरच कौतुकास पात्र आहेत.

 चौसाळा नगरीचे सरपंच कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर असतात. मग आपल्या मुलाच्या वाढदिवसाला वृक्षारोपण असो की पूरग्रस्त लोकांना अन्नधान्य वाटप प्रत्यक्ष कोल्हापूर सातारा येथे जाऊन वाटप करण्याचे महतभाग्याचे काम असो किंबहुना लॉकडाऊनचे अनुक्रमे एक दोन आणि तीन क्रमांक असोत यात गरजू लोकांना अन्नधान्याचे किराणा वाण सामानाचे किट वाटप असोत यात कायम सरपंच मधुकर तोडकर अग्रभागी असतात . विषय लग्नाचा म्हटल्यावर तर सरपंच नक्कीच मैलाचा दगड स्थापित करणार यात काही शंका नाही. म्हणूनच कु. दिव्या श्रीमान नवनाथ संभाजी तोडकर यांची कन्या आणि चिरंजीव प्रदीप श्री बळीराम विश्वनाथ तोडकर यांचा विवाह कोविड 19 च्या वाढता प्रादुर्भाव पाहता अगदीच साध्या पध्दतीने उभयंताच्या  जीवनातील अनमोल प्रसंग  आपल्या नयनात मोजक्या लोकांच्या समक्ष गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करत आहेत हे विशेष .! या नवदापंत्यांना त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.