आष्टी । वार्ताहर
आष्टी तालुक्यातील विविध गावात आलेले सुमारे 80 मजूर सोमवारी तर 25 मजूर बुधवारी त्यांच्या गावी रवाना झाले. 80 मजूर रेल्वेने तर 25 मजूर एस टी बसने रवाना झाले. आ सुरेश धस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला.
टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यापासून विविध गावात अडकलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावाकडे जाण्यास उत्सुक आहेत. अशा मजुरांनी आ सुरेश धस आणि तहसीलदार निलिमा थेऊरकर यांच्याशी संपर्क साधला. सोमवारी 80 मजूराना त्यांच्या गावी जाण्यासाठी नगर रेल्वे स्टेशन पर्यंत पाठवण्यात आले. तेथून त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीट देखील कन्फर्म करून देण्यात आले. आष्टी येथील सुनील रेडेकर, सचिन रानडे, चिंटू अग्रवाल, कडा येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी यासाठी प्रयत्न केले. छत्तीसगड राज्यातील 27 तर उत्तर प्रदेश मधील 53 मजूर सोमवारी गावी परतले. तर बुधवारी मध्यप्रदेशातील 25 मजुरांना एस टी बसने मध्य प्रदेश सीमेपर्यंत सोडण्यात आले.
Leave a comment