बीड । वार्ताहर
कोरोनाच्या संकटात आपला हातभार लागावा लोकांच्या मुखात अन्नाचा घास जावा यासाठी वैष्णोदेवी भक्त संतोष सोहनी यांनी आपल्या वैष्णो पॅलेस येथे गेल्या अनेक दिवसापासून सुरु केलेल्या अन्नदानाचा महायज्ञाला अनेकांच्या मदतीचा ओघ सुरु झाला आहे.बुधवारी (दि.13) द्वारकादासजी मंत्री राजस्थानी विद्यालयाचे माजी प्राचार्य प्रभाकरराव महाजन सर यांनी संतोष सोहनी यांच्या कार्याला प्रेरित होऊन 25 हजाराची मदत केली.
यावेळी संतोष सोहनी यांच्यासह उपस्थितांनी महाजन सर यांचे आभार मानले. यावेळी दिलीप खांडे, शिवा दायमा, मनोज महाजन, संजय सोहनी, गोविंद शर्मा, भरत पटेल यांची उपस्थिती होती. संतोष सोहनी यांचे द्वारकादासजी मंत्री विद्यालयात शिक्षण झाले, त्यावेळी प्रभाकरराव महाजन सर हे त्या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक होते. समाजासाठी निस्वार्थ भावनेने एखादे कार्य हाती घेतले की समाजातील अनेकांचा हातभार त्या कार्याला लागतो हे मात्र नक्की आहे.असेच सध्या सोहनी यांच्या अन्नदानाच्या महायज्ञातून दिसून येत आहे. महाजन सर हा अन्नदानाचा महायज्ञ पाहुन भाराऊन गेले. पुण्याचे हे कार्य पाहुन त्यांनी संतोष सोहनीचे तोंडभरुन कौतूक केले आणि 25 हजार रुपयाची मदत केली. संतोष सोहनी यांच्या या अन्नदानातुन आज अनेक लोक तृप्त होत आहेत.त्यामुळे आपलेही हातभार लावण्याचे कर्तव्य आहे या भावनेतून मदत करण्याची ईच्छा होती. दिलेल्या मदतीतून अनेकांच्या मुखात अन्नाचा घास जाईल याचे समाधान वाटत आहे अशी प्रतिक्रिया यावेळी प्रभाकरराव महाजन यांनी दिली.
अनेकांच्या मदतीमुळेच उपक्रम यशस्वी- संतोष सोहनी
सध्या तिसरे लॉकडाऊन सुरु आहे तरीही हा महायज्ञ सुरु आहे. सर्वांची मोलाची साथ मिळत आहे.माता वैष्णोदेवीची कृपा आणि अनेकांच्या मदतीमुळेच हा अन्नदानाचा यशस्वीपणे सुरू आहे अशी प्रतिक्रिया यावेळी संतोष सोहनी यांनी व्यक्त केली.
Leave a comment