केज । वार्ताहर
सध्या परप्रांतीय मजूर पायी चालत आपल्या गावाकडे निघाले असून केज तालूक्यात राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, व्यापारी यांच्याकडून त्यांची जेवणाची, मुक्कामाची सोय होत असल्याचे दिसून येत आहे.दररोज काही काम धंदा केल्याशिवाय कुटुंबाचा चरितार्थ चालू शकत नसणार्या एका फळ विक्रेत्याने विकायला आणलेले फळे ही सांगली येथून पायी निघालेल्या बिहार राज्यातील मजुरांना सर्व फळे मोफत वाटले.
केज येथे सांगली येथून एक बिहार राज्यातील तेरा मजूर हे पायी त्यांच्या गावाकडे येत असताना केज येथे आले होते. पंधरा दिवस ते रात्रन दिवस चालत असल्यामुळे हातापायात त्यांच्या त्राण उरलरले नव्हते. म्हणून ते केज येथील महामार्गाच्या कडेला असलेल्या रस्त्याच्या कडेला बसले होते. त्याच्या शेजारीच केज येथील अगदी हातावर पोट असलेला फळ विक्रेता हा हातगड्यावर खरबूज विकित होता. मजुरांची अवस्था पाहून त्यांचे मन हेलावले. सद्गगदित होऊन त्या फळ विक्रते त्याने आपल्या गाड्यावर विक्रीसाठी आणलेली सर्व फळे त्या मजुरांना दिली. तसेच यावेळी या मजुरांना नायब तहसीलदार आशा वाघ, रत्नाकर शिंदे आणि अमोल गायकवाड यांनीही मदत केली.नायब तहसीलदार आशा वाघ यांनी स्वतः खिचडी शिजवून या परप्रांतीय मजुरांना खाऊ घातली तर शिवसेनेचे रत्नाकर शिंदे यांनी विनामूल्य सर्वांना शिवभोजन थाळी दिली.
Leave a comment