माजलगाव तालुक्यात किराणा किटचे वाटप सुरू
माजलगाव । वार्ताहर
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीड जिल्हा परिषदेच्या वतीने लॉकडाऊनच्या काळात गावी परतलेल्या ऊसतोड मजुरांना किराणा किटच्या वाटपाची सुरूवात बुधवार दि.13 मे रोजी पंचायत समिती येथे करण्यात आली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते क्वारंटाईन करण्यात आलेल्या 31 ऊसतोड मजुरांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. माजलगाव तालुक्यातील एकूण 370 ऊसतोड मजुरांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या वाटपा प्रसंगी आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह सभापती कल्याण आबूज, पं.स.सभापती भागवत खुळे, उपसभापती डॉ.वसिम मनसबदार, जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ, रामप्रभु साळुंके, जयदत्त नरवडे, गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण, विस्तार अधिकारी राजेंद्र पारडकर यांची उपस्थिती होती. माजलगाव येथील पंचायत समिती कार्यालयात ऊसतोड मजुरांना किराणा वस्तूंच्या किटच्या वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. माजलगाव तालुक्यातील एकुण 370 ऊसतोड मजुरांच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, तर या 370 कुटुंबात एकुण 1033 अशी लोकसंख्या आहे. यात बुधवारी प्रातिनिधिक स्वरूपात पात्रुड 13, सोन्नाथडी 8, पिंप्री 1, लुखेगाव 8 आणि रेणापुरी येथील 1 अशा एकूण 31 ऊसतोड मजुरांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. तर उर्वरित किटचे जि.प.गटाचे सदस्य, पं.स.गणाचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक आणि सनियंत्रण अधिकारी यांच्या उपस्थितीत करणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी राजेंद्र पारडकर यांनी माहिती दिली. या किराणा किटमध्ये सहाशे पन्नास रूपये प्रमाणे कोलम तांदूळ 5 किलो, साखर 1 किलो, तूरदाळ(उच्च प्रतिची) 1 किलो, मीठ 1 किलो, मिरची पावडर 200 ग्रॅम, हळदी पावडर 100 ग्रॅम, कांदा, लसून मसाला 200 ग्रॅम, जिरे 100 ग्रॅम, मोहरी 100 ग्रॅम, अंगाची साबण (संतुर, लाईफबॉय) 75 ग्रॅम (किमान), कपड्याची साबण (व्हील, रिन) 75 ग्रॅम (किमान) असा समावेश असणार आहे. यावेळी सोशल डिस्टन्स पाळून व मास्क वापरून किराणा वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
-----
Leave a comment