अन्न, औषध प्रशासन व पोलीसांची कारवाई
माजलगाव | वार्ताहर
अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलेला ३६ लाख ४९ हजाराचा गुटखा नष्ट करण्यात आला. बीडचे अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शहा यांच्या आदेशावरून बुधवार दि.१३ मे रोजी दुपारी माजलगाव धरण परिसरातील खुल्या मैदानात गुटखा जाळून नष्ट करण्यात आला.
माजलगावात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत गुन्हा क्रं.२३/१८ दि.९ नोव्हेंबर २०१८ रोजी जप्त केलेला गुटखा १३,८३,९३६ रूपये, गुन्हा क्रं.३१६/१९ दि.२८ नोव्हेंबर २०१९ रोजी जप्त केलेला गुटखा १५,७४० रूपये, गुन्हा क्रं.०९/२० दि.०६ जानेवारी २०१९ रोजी जप्त केलेला गुटखा २२,५०,०० रूपये असा एकुण ३६ लाख ४९,७६७ रूपये किंमतीचा गुटखा अन्न औषध प्रशासन बीडचे सहाय्यक आयुक्त मिलिंद शहा यांच्या आदेशावरून अन्न सुरक्षा अधिकारी ॠषीकेश मरेवार, अनिकेत भिसे, माजलगाव शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जयराज भटकर, गोपनीय शाखेचे पोलीस अंबादास बेले, क्राईम मोहरिल पोलीस रघुनाथ शेवरे यांनी या तिन्ही प्रकरणातील जप्त करण्यात आलेला गुटखा माजलगाव धरण परिसरातील खुल्या मैदानात बुधवार दि.१३ मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जाळून नष्ट करण्यात आला. अवैद्य गुटखा विक्री करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याने अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणले आहेत.
Leave a comment