पाचव्या टप्प्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद ; आज पर्यंत 225 जणांचे रक्तदान
अंबाजोगाई । वार्ताहर
बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवार,दिनांक 11 मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरात काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पाचव्या टप्प्यात 50 जणांसह आजपर्यंत एकूण 225 जणांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अशी माहिती शिबिराचे आयोजक तथा बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
सध्या अंबाजोगाईसह राज्यात लॉकडाऊनची परस्थिती आहे.तर दुसरीकडे रक्ताचाही तुटवडा ही मोठ्या प्रमाणात जाणवतोय.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार जिल्हा काँग्रेसने पुन्हा पाचव्या वेळी सोमवार,दि.11 मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.रक्तदान शिबिर प्रसंगी नगरसेवक मनोज लखेरा,काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,सुनिल व्यवहारे,वाजेद खतीब,धम्मा सरवदे,आसेफोद्दीन खतीब,
माणिकराव वडवणकर,राणा चव्हाण,गणेश मसने,प्रभारी अधिकारी डॉ.विनय नाळपे,भारत जोगदंड हे उपस्थित होते.या शिबिरात अश्विन सावंत,सुधाकर टेकाळे,सचिन जाधव,शुभम मोदी,नितीन जाधव कुमार सरवदे,जगदीश अजमेरा,निखिल नरवाडकर,रवींद्र लंगे,रोहित वाघमारे,ज्ञानोबा वैद्य, दत्तात्रय हुलगुंडे,राहुल गिरी, विशाल फोलाने,संदीप तनपुरे,वैभव साठे,गजानन काळे,अमरदीप गायकवाड,रितेश वाघमारे,रोहित देवकर,गणेश भोसले,संतोष अपूर्वा,तारकेश श्रीवास्तव,सुशील कुंबेफळकर,लखन बलाढ्ये,तेजस्विनी शिंदे,शुभम वाघमारे,गोविंद हरणे, महेंद्र दहिवाळ,राहुल लोमटे,शेख सद्दाम शब्बीर,व्यंकटेश घाडगे,लक्ष्मण शिंदे,पवन खळेकर,विजय सिरसट,शशिकांत दहीवडे असे एकूण 51 जणांनी रक्तदान केले.तर शिबिराच्या यशस्वितेसाठी शशिकांत पारखे,तंत्रज्ञ सय्यद मुश्ताक यांचे सहकार्य लाभले.रक्तदात्यांना वेळ ठरवून दिल्याने रक्तदान शिबीराच्या ठिकाणी गर्दी झाली नाही.आयोजकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करीत प्रत्येकांमध्ये किमान एक मीटर इतके सुरक्षित अंतर ठेवून सॅनिटायझर आणि मास्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
सामाजिक बांधिलकी जोपासत काँग्रेसचे रक्तदान-राजकिशोर मोदी
सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य सेवेला मदत व सहकार्य करण्याच्या विधायक हेतूने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पाचव्या टप्प्यात 50 जणांसह आजपर्यंत एकूण 225 जणांनी रक्तदान केले आहे.येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे व महसुलमंञी तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी आपल्या सर्वांना काही दिवसांपूर्वीच आवाहन केल्यामुळे बीड जिल्हा काँग्रेसने 3 एप्रिल,10 एप्रिल,14 एप्रिल,1 मे आणि 11 मे रोजी पाचव्या टप्प्यात असे 5 वेळा रक्तदान शिबिर आयोजित केले.या शिबिरात एकूण 50 जणांनी रक्तदान केले.त्या सर्व रक्तदात्यांचे आभार.पुढील काळात रूग्णालयाच्या आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने असे मिळून एकूण 500 काँग्रेस कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिली.
Leave a comment