किल्ले धारूर । वार्ताहर
समाजकल्याण सभापती कल्याण आबूज यांचे हस्ते ऊसतोड कामगारांना अन्नधान्य कीटचे प्रातिनिधीक पंचायत समिती कार्यालय येथे वाटप करण्यात आले. कोरानाच्या महामारीच्या संकटसमयी साखर कारखान्यांवरुन परतलेल्या ऊसतोड मजुरांना कोरांटाईन कालावधीमध्ये मदत म्हणून जिल्हापरिषद ने स्वनिधीतून 65 लाख रु तातडीने मदत केली आहे. आजपर्यंत धारुर तालुक्यातील 284 कुटूंब प्रभावीत असून त्यांना प्रत्येकी 650 रुपयांप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर निधी वाटप केला आहे.
या निधीतून जिवनावश्यक किराणा मालाचे कीट ग्रामपंचायत स्तरावरुन खरेदी केले. कीटमध्ये तांदूळ कोलम 5 कीलो, मीरची पावडर 200 ग्रॅम, हळद पावडर 200 ग्रॅम, जिरे, मव्हरी 100 ग्रॅम, कपडयाचा व आंघोळीचा साबण 75 ग्रॅम, तसेच गव्हाचे पीठ 5 कीलो, साखर 1 किलो, तुरदाळ 1 किलो, सोयाबीन तेल 1 किलो, मीट पुडा 1 किलो, अशा वस्तुचा समावेश आहे.प्रातिनिधीक स्वरुपात पंचायत समिती सभागृहात पंचायत समिती धारुरच्या सभापती सौ. चंद्रकला नागरगोजे यांचे अध्यक्षतेखाली व कल्याणराव आबुज, समाजकल्याण सभापती जिल्हा परिषद बीड यांचे शुभ हस्ते साधे पणाने व सोशल डिस्टसींगचे पालन करुन पार पाडले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन प्रसिध्द उद्योजम माधव निर्मळ, हनुमंत नागरगोजे, मदन धोतरे, उपसभापती प्रकाश कोकाटे, पं.स.सदस्य बालासाहेब मोरे,पत्रकार सर्यकांत जगताप, आरणवाडीचे सरपंच लव्ह फुटाणे पिंपरवाडा उपसरपंच डॉ.जायभाये, चोरांबा सरपंच मल्हारी भालेराव, पंचायत समितीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदरील कीटसाठी ग्रामसेवक संघटना धारुर यांचेकडून त्या कीटमध्ये पाच कीलो गव्हाचा आटा देण्यात आला. तसेच एक दिवसात नियोजन करुन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीला कीट पोहोंच केल्या. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता विस्तार अधिकारी अनिल चौरे, सतीष गिरी, राठोड पी.आर.कदम, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष विजय गायसमुद्रे जिल्हा उपाध्यक्ष संजय देशमुख सुनिल पवार, गुरु आकुसकर यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनार्धन सोनवणे, आभार गट विकास अधिकारी सोपान अकेले यांनी केले.
Leave a comment