शिरूर कासार । वार्ताहर
शिरूर कासार शहरातील द्वारका कॉम्प्लेक्स कालिंकानगर या पाणीपुरवठा करणार्या नळ योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार येथील नागरिकांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. निकृष्ट दर्जाचे पाईप वापरल्यामुळे पाणी सोडले असता अनेक ठिकाणी नळ योजनेतून गळती होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
शहरातील वार्ड क्रमांक 16 मध्ये द्वारका कॉम्प्लेक्स, कालिंकानगर भागात नळयोजनेला ठीक ठिकाणी गळती लागली आहे. नगर पंचायत प्रशासनाकडून वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली उधळपट्टी करण्यात येत असली तरी निकृष्ट दर्जाच्या पाईपमुळे सुरळीत पाणी पूरवठ्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यातच अंदाज पत्रकास डावलून पाईपलाईनचे काम थातूर मातूर करण्यात आल्याने नागरिकांना मुबलक पाणी असताना टंचाईला समोरे जावे लागत आहे. नळयोजनेच्या मुख्य वहिनीलाच जागो जाग गळती लागल्याने रस्त्यावर पाण्याचे ढोह संचात आहेत. गळती थांबवण्यासाठी दुरुस्ती ऐवजी दर्जेदार पाईप वापरून सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी या भागातील नागरिकांनी नगरपंचायतच्या मुख्याधिकारी शिरूर कासार यांच्याकडे दिली आहे.
Leave a comment