बीड । वार्ताहर
लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व खा.डॉ.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांच्या आदेशावरून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीची टीम गेली 35 दिवसापासून प्राथमिक आरोग्य तपासणी मोहिमेत कार्यरत आहे. आज ग्रामीण भागातील लिंबागणेश सर्कल मधील बेलखंडी पाटोदा येथे आरोग्य तपासणी मोहीम जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण नसले तरी खबरदारीचा उपाय व नागरिकांची किमान प्राथमिक आरोग्याची तपासणी व्हावी, यासाठी थर्मल स्कॅनिंग सह रक्तातील ऑक्सिजन, रक्तातील साखरेचे प्रमाण, रक्तदाब, ह्रदयाचे ठोके व ताप खोकला यासारख्या प्राथमिक तपासणी भाजपच्या टीम कडून केली जात आहे. भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते डॉ.लक्ष्मण जाधव, विक्रांत हजारी भगीरथ बियाणी, अमोल वडतीले, डॉ.अभय वनवे, दत्ता परळकर, संभाजी सुर्वे, संध्या राजपूत, संग्राम बांगर, गणेश बहिरवाळ, पंकज धांडे, राकेश बिराजदार, अजय ढाकणे, बद्रीनाथ जटाळ यांच्या परिश्रमातून आरोग्य तपासणी मोहीम राबवली जात आहे.कालपर्यंत बीड शहरात या टीमने 85 हजार 700 नागरिकांची तपासणी केली आहे. या तपासणी मोहिमेत विविध आजाराचे अनेक रुग्ण आढळून आले त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन देण्याचे काम या टीमने केले आहे. आज ग्रामीण भागातील नागरिकांसाठीबेलखंडी पाटोदा येथून सुरुवात करण्यात आली. यावेळी बेलखंडीचे सरपंच संदिपान बडगे, महेश सावंत, शरद बडगे शंकर तुपे, रवींद्र कळसाने, दिलीप डोंगर कार्यकर्त्यांनी आरोग्य मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले . गावातील सुमारे साडेतीनशे नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून प्राथमिक तपासणी करून घेतली आहे.
Leave a comment