वडवणी । सुधाकर पोटभरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉक डाऊन असल्याने हजारोंची गोरगरीब लोकांची उपासमार होत आहे. अशा लोकांना मदत करण्याचे आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी केले होते,त्यानुसार वडवणीचे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते बाबुशेठ नहार आणि उद्योजक गुलाबराव राऊत हे गेल्या 25 दिवसापासून गरिबांना जेवण देत आहेत. नहार व राऊत यांच्या वतीने अन्नयज्ञाने हजारोंच्या पोटाची भुक भागवली आहे.
याच भुकेलासाठी स्वयंपाक बनवणारे आठ कारागीरांची मोलाची साथ मिळाली आहे. कोणताही कारागिर स्वयंपाक बनवणार्यांना मोठे महत्व असते. कारण लग्न सोहळ्यात मोठा स्वयंपाक बनवतात पण तो मजूरी म्हणून त्यांना त्याचा मोबदला मिळत असतो. मात्र या कारागिरांनी सुध्दा मोफत स्वयंपाक करून देत आहोत अशी भावना व्यक्त केली. दरम्यान संकटात अडकलेल्या लोकांसाठी मोफत मदत करून सेवा देण्यासाठी पाच पुरूष आणि तीन महिला असे आठ जण रोज स्वयंपाक बनवण्याची सेवा करत आहेत. या कामासाठी सेवा देणारे कारागीर श्रीराम घुले, महादेव राऊत, दत्ता वाघमारे, रेखाताई आळणे, सुनिता डिगे, संदिपान शिदे, बाबासाहेब क्षीरसागर हे सहकारी ही सारी मंडळी निस्वार्थ भावनेने आपली सेवा बजावत आहेत. त्यांचे करावे तेवढे कौतूक कमी आहे.
वडवणी येथील समाजसेवक बाबुशेठ नहार व गुलाबराव राऊत यांनी समाजसेवेचा आवड असल्याने नेहमीच गोरी गरिंबासाठी सदैव तत्पर असणारे म्हणून अव्याहतपणे ते काम करतात. आता कोरोनाच्या संकटात कोणीही अन्न पाण्याविना उपाशी राहू नये यासाठी बाबुशेठ नहार व गुलाबराव राऊत हे स्वखर्चातून वडवणी येथील व परिसरातील गोरगरिबांना खिचडी पोळी भाजी गरम गरम भाकरी बेसण थेट गरिब लोकांपर्यंत पोहच करत आहेत. गेल्या 25 दिवसांपासून त्यांचा हा अन्नयज्ञ सुरू आहे. गरिबांच्या पोटाची भूक भागवण्याचे काम करत असणार्या बाबुशेठ नहर गुलाबराव राऊत यांनी या माध्यमातून देखील अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या अन्नयज्ञास आता वडवणी वासीयांनी देखील मदतीचा हात पुढे करण्यास काही हारकत नाही. कोणताही माणूस उपाशी पोटी झोपला नाही पाहिजे यासाठी आपण कार्यरत राहू ,ज्यांना गरज असेल त्यांनी रोज सकाळी शिवाजी चोक येथे 10 ते 2 वाजेपर्यंत जेवण मिळेल अशी माहिती बाबुशेठ नहार, गुलाबराव राऊत, पेशवे, कालीदास देेेवा, गणेश जोशी यांनी केले आहे.
---------------
Leave a comment