आष्टी । वार्ताहर
कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे सर्व नागरिक घर बंद झाले आहेत.या महामारीमध्ये अनेक दानशूर व्यक्तींकडून नागरिकांना अन्नधान्य,किराणा,मेडीकल किट वाटप केले जात आहेत.अशा परिस्थितीमध्ये आष्टी शहरासह तालुक्यातील रेशन दुकानदार कुपनधारकांना मार्गदर्शन करत नाहीत,नियमानुसार धान्य देत नाहीत. पावती देत नाहीत,यामुळे नेमके धान्य किती मिळते हे माहिती होत नाही, साखर,हळद,मीठ हे वाटप कसे होते हे माहीत नसल्याने पावती न दिल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्यामुळे कुपन दुकानदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी नसता लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबवला जाईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी तहसिलदार यांना दि.12 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आष्टी शहरासह ग्रामीण भागातील रेशन दुकानदार तालुक्यातील नागरिकांची धान्यासाठी पिळवणूक करत असून नियमानुसार धान्य वाटप करत नाहीत,मोफत धान्यामध्ये कोणते लाभार्थी आहेत ते व्यवस्थित पणे सांगत नाहीत, लाभार्थ्यांना तुम्हाला माल मिळत नाही म्हणून परत पाठवत आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांना पावती देणे बंधनकारक असताना संबंधित कुपनधारकांना पावती दिली जात नाही.यामुळे कुपन धारक लाभार्थी हे माहितीपासून वंचित आहेत नेमके धान्य आपल्याला किती मिळते व कुपनचे आपणास किती धान्य येते तसेच संबंधित दुकानदार दुकानापुढे अन्नसुरक्षा,अंत्योद्य,एपीएल,शे
Leave a comment