ऑटोरिक्षा संघटनेसोबत पोलीस प्रशासनाची बैठक
बीड । वार्ताहर
लॉकडाऊन व संचारबंदीदरम्यान कोणतीही ऑटोरिक्षा उद्यापासून रस्त्यावर दिसताक्षणी जप्त करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही कारणासाठी आता ऑटोरिक्षा रस्त्यावर आणता येणार नाही.असे आढळून आल्यास संबंधित रिक्षा जप्त करण्याचे आदेश पोलीसांना देण्यात आले आहेत.
कोरोनाचा धोका लक्षात घेवून जिल्हा प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. सोमवारी (दि.11) उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत यांनी शहर पोलीस ठाण्यात ऑटोरिक्षा संघटनेची बैठक घेतली. यावेळी या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.या आदेशानुसार यापुढे शहरात ऑटोरिक्षाचा वापर रुग्ण तसेच किराणा, भाजीपाला व इतर वस्तू ने-आण करण्यासाठी करता येणार नाही. असे आढळून आल्यास ती ऑटोरिक्षा जप्त करण्यात येईल असे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्व रिक्षा चालक व मालक यांनी या गंभीर गोष्टीची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे.
जर या गोष्टी बद्दलची माहिती सर्व ऑटोरिक्षा चालक व मालक यांना सतर्क करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी ही माहिती बीड जिल्हा परमिट मालक-चालक ऑटोरिक्षा संघटना यांना दिलेली आहे. या बैठकीस ऑटोरिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अरुण कळसकर, अध्यक्ष सतीश जाधव, सहाय्यक अध्यक्ष शौकत मिया, शेख मुजीब, उपसहायक अध्यक्ष अशोक तांबडे, सचिव अशोक घोलप, शहर अध्यक्ष किशोर बनसोडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी याची गंभीरतापूर्वक नोंद घेऊन व इतरांनाही सांगावे असे आवाहनही पोलीस प्रशासनाने केले आहे.
-------
Leave a comment