कोरोना संसर्गामुळे प्रवासी रेल्वेसेवा 21 दिवस स्थगित केल्यावर 15 एप्रिलपासून स्वतःच्या सर्व सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वेने चालविली आहे. रेल्वेचे सर्व सुरक्षा कर्मचारी, अन्य कर्मचारी, टीटीई आणि अन्य अधिकाऱयांना 15 एप्रिलपासून कामावर परतण्यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. सरकारकडून अनुमती मिळाल्यावर रेल्वेसेवा सुरू केली जाणार आहे. सद्यकाळात रेल्वेंसाठी तिकीट आरक्षणास प्रारंभ झाला आहे.
सर्व 17 विभागांना स्वतःची सेवा संचालित करण्यासाठी तयार राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. चालू आठवडय़ाच्या अखेरीस संबंधित विभागांना ठोस कार्ययोजना पाठविली जाणार आहे. 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाळेबंदीची घोषणा केल्यावर रेल्वेने 21 दिवसांसाठी 13523 रेल्वेगाडय़ांची सेवा रोखली होती. या कालावधीत मालगाडी सेवा मात्र सुरूच आहे. खासगी रेल्वेंसाठीही तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. सेवा सुरू करण्यापूर्वी सर्व रेल्वेगाडय़ांना सॅनिटाईज केले जाणार आहे.
Leave a comment