केज । वार्ताहर
बीड जिल्हा परिषदेच्या स्वनिधितून ऊसतोड कामगारांना किराणा किटचे वाटप करण्याच्या सूचना दिल्यानंतर आज विडा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत बेंगळवाडी,बुरंडवाडी,गौरवाडी येथिल 78 ऊसतोड मजुरांच्या कुटुंबांना जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांच्या उपस्थितीत किराणा किटचे वाटप करण्यात आले आहे.
बीड जिल्यातील बहुतांश लोक हे ऊसतोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र अथवा कर्नाटक येथे जात असतात परंतू अचानक आलेल्या कोरोनोच्या संकटामुळे यातील ऊसतोडणीसाठी गेलेले कित्येक कामगार ज्या त्या ठीकाणावरच अडकवून पडले होते.माञ काही काळ उलटल्यानंतरही राज्य सरकारने ऊसतोड कामगारांना त्यांच्या घरी पाठवण्याचे आदेश दिल्याने त्यांना आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सर्व मजूर घरी परतत असतानाच बीड जिल्हा परिषदेने स्वत:च्या सन 2020 -21 च्या स्वनिधितून या कामगारांना मोफत कराणा किटचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानूसार आज केज तालुक्यातील विडा ग्रामपंचायतीने विडा व आंतर्गत बेंगळवाडी,बुरंडवाडी,गौरवाडी येथिल 78 ऊसतोड कामगारांना विडा गटाचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांच्या उपस्थितीत कीराणा किटचे वाटप करण्यात आले आहे.प्रसंगी ग्रामविकास अधिकारी धनंजय खामकर,तलाठी लोभाजी भोरजे,सरपंच पती भैरवनाथ काळे,उपसरपंच बापुराव देशमुख,ग्रा.पं.सदस्य अशोक वाघमारे,शिवाजी वाघमारे,वसंत शिंदे,बाबासाहेब मुळे व उपस्थित लाभार्थी उपस्थित होते. बीड जिल्हा परिषदेने ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्याच्या सूचना देताच विड्याचे ग्रामविकास अधिकारी धनंजय खामकर यांनी तत्परता दाखवत तात्काळ किराणा किटचे वाटप केले आहे.
Leave a comment