केज । वार्ताहर
कै.श्रीमंत नानासाहेब देशपांडे यांच्या स्मरणार्थ देशपांडेज श्री समर्थ गार्डन रेस्टारंट याठिकाणी वाटसरुना मोफत अन्नदान यज्ञ सुरू केला असुन सकाळी 11 ते 2 व सायंकाळी 7 ते 9 दरम्यान हे अन्नदान करण्यात येणार आहे.श्री स्वामी समर्थ महाराज व कै. नानासाहेब महाराज देशपांडे यांच्या काळातील घटना सुध्दा उल्लेख करावा लागेल. अक्कलकोट येथे त्याकाळी दुष्काळामुळे अजिबात पिके आलेली नव्हती, तेव्हा अक्कलकोट येथील सर्वानी श्री स्वामी महाराजांना विचारले की, महाराज आता कस करायचे? तेव्हा स्वामी म्हणाले माझा नाना यायलाय अन्नधान्य घेऊन आणि केजला चांगली पिके आली होती. तेव्हा नानासाहेब महाराज म्हणाले, यावेळी आपण केजहून अक्कलकोटला धान्य घेऊन जाऊ व कै. नानासाहेब महाराजांनी केज येथून बैलगाड्यानी अन्नधान्य नेले व दत्तजयंती साजरी केली होती.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाचे निस्सिम भक्त कै. श्रीमंत नानासाहेब महाराज देशपांडे यांच्या स्मरनार्थ वाटसरुंना मोफत अन्नदान आज दि. 11 मे पासून 17 मे पर्यत चालू राहणार आहे.पुजनीयनानासाहेब यांच्या काळात दररोज सायंकाळी दवंडी दिली जायची की गावात कोणी उपाशी असेल तर येऊन जेवण करावे त्यांचा वारसा आजही चालू ठेवण्याचा प्रयत्न प्रशांत देशपांडे, सचीन देशपांडे, सुनिल देशपांडे ,समिर देशपांडे, प्रविण देशपांडे, यांनी केला असून भाऊसाहेब देशपांडे, दिलीपराव देशपांडे यांच्या आशीर्वादाने आज दि 11 मे रोजी सकाळी अन्नदान यज्ञास सुरूवात केली यावेळी पशुपतीनाथ दांगट,नगर पंचायतचे मुख्याधिकारी भोसले व इतर मान्यवरांच्या उपस्थितीता सुरू केले . यावेळी अंबाजोगाई तालुक्याच्या वाघोलीचा बालाजी जाधव हा मागील सहा दिवसापासून पायी चालत पुण्याहून निघाला होता एका पेट्रोल पंपावर काम करणारा तरुण पायी चालत असल्याचे सचिन देशपांडे यांना दिसला त्याच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
Leave a comment