गेवराई । वार्ताहर
लॉकडाऊनच्या कार्यकाळातही वाळू माफीया वाळूची तस्करी सुरू असल्याने मध्यरात्रीच्या दरम्यान हिंगणगाव येथून वाळू भरुन जात असलेला हायवा रांजणी ते पाडळशिंगी दरम्यान नायब तहसिलदार प्रशांत जाधवर यांनी पकडून तहसील कार्यालयात लावला असून गेल्या तीन दिवसात त्यांची ही दुसरी कारवाई आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून अनेक ठिकाणी अनाधिकृत वाळू उपसा सुरूच आहे. सध्या लॉकडाऊनचा कार्यकाळ असल्याने सगळे प्रशासकीय अधिकारी कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याच्या कामात गुंतलेले असताना या संधीचा फायदा वाळू माफीया घेत असून अवैध वाळू उपसा करत आहेत. दरम्यान मध्यरात्री हिंगनगाव गोदा पात्रातून एम.एच.12 के.पी.4597 या क्रमांकाचा हायवा वाळू भरून जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी फाट्याच्या जवळ पकडण्यात आला असून पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात लावला आहे. ही कारवाई नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्यासह तलाठी राजेश राठोड,जितेंद्र लेंडाळ यांनी केली. तर नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या पथकाची तीन दिवसातली ही दुसरी कारवाई असून त्याच्या या कारवाईमुळे वाळू माफियांच्या धाबे दणाणले आहेत.
Leave a comment