मराठवाडा शिक्षक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे धाव
बीड । वार्ताहर
महात्मा फुले विद्यालय, हातोला या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कुचराईमुळे या शाळेचे शिक्षक भरत लहू चाटे हे दहा महीन्या पासून वेतना पासून वंचित आहेत. संबंधित शिक्षकांने मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना वेतन मिळावे अनेकदा मागणी केली. मराठवाडा शिक्षक संघाने देखील श्री चाटे यांचे वेतन अदा करण्याची मागणी निवेदन मा.शिक्षणाधिकारी महोदयां कडे केले. परंतु त्या बाबत शिक्षण विभाग काहीच कारवाई करत नसल्याने मराठवाडा शिक्षक संघाने मा. मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे.
भरत लहू चाटे हे रघुनाथ मुंडे विद्यालय कातकरवाडी या शाळेवरून शैक्षणिक वर्ष 2017-1218 या शैक्षणिक वर्षात अतिरिक्त झाले. त्यांचे समायोजन महात्मा फुले विद्यालय, हातोला ता.आंबेजोगाई या शाळेत रिक्त पदावर करण्यात आले. 25 जुलै 2019 रोजी श्री चाटे त्या शाळेत रूजू झाले. तेव्हा पासून ते त्या शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपले वेतन अदा करावे अशी मागणी त्यांनी वेळोवेळी शाळेचे मुख्याध्यापकांकडे केली. मुख्याध्यापक दाद देत नसल्याने शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचेकडे तीन चार वेळा निवेदनाद्वारे केली. मराठवाडा शिक्षक संघाने चाटे यांचे वेतन अदा करण्याची मागणी निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचेकडे केली. मात्र वेतन मिळण्याची कसलीच कारवाई होत नसल्याने मराठवाडा शिक्षक संघाने मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री यांचे धाव घेतली असून दहा महीन्या पासून वेतनापासून वंचित ठेवून शिक्षकांवर उपासमारीची वेळ आणणार्या मुख्याध्यापकावर कडक कारवाईची मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष डी.जी.तांदळे आणि जिल्हा सचिव राजकुमार कदम यांनी सरकारकडेनिवेदनाद्वारे केली आहे.
Leave a comment