नागरिकांची सहनशिलता संपली, शेतकर्यांचा विचार करा
आष्टी । वार्ताहर
केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्या जिल्ह्यात एकवीस दिवसात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही तर तो जिल्हा रेड झोन मध्ये असला तर ऑरेज झोन आणि ऑरेज झोन मध्ये असला तस ग्रीन झोन मध्ये येतो. तर बीड जिह्यात मागील महिन्याभरात एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे आपला जिल्हा केंद्र सरकारच्या नियमानुसार ग्रीन झोन मध्ये असूनही जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी एकदिवसाआड फक्त अडीच तास ठेवली आहे. परिणामी आता लोकांना वेळ वाढवून मिळत नसल्याने लोकँ रस्त्यांवर उतरत आहेत. या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेऊन बीड जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी शिथीलतेची वेळ वाढविण्याची मागणी आ.सुरेश धस यांनी केली आहे.
आष्टी शहरात सोमवारी सकाळी सात ते साडेनऊ या संचारबंदी शिथीलतेच्या वेळेत आ.सुरेश धस यांनी शहरात येऊन पाहणी केली.यावेळी तहसिलदार निलीमा थेऊरकर, नगर पंचायतच्या मुख्याधिकारी कु.शारदा दळवी, पोलिस निरीक्षक माधव सुर्यवंशी यांच्यासह आदि अधिकारी उपस्थित होते. यावेळी आ.धसांनी शहरातील व्यापा-यांकडे जाऊन त्यांचे गार्हाणे ऐकून घेत प्रत्येक व्यापा-यांनी आपल्याला वेळ पुरत नसल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत असल्याचे सांगितले. तसेच पोलिस आणि नागरिकांतही हामरी तुमरीचे प्रकार वाढले आहेत. परिणामी पोलिसही वैतागले असून, लोकही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे आ.सुरेश धस यांनी बीड जिल्हाधिकारी यांना पञव्यव्हार करत आपला जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे नागरिकांनी देण्यात येणारी शिथीलता अडीच ऐवजी पाच तासांची द्यावी जेणे करून नागरिकांची गर्दी होणार नाही. तसेच सध्या काही परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीही शेतीतील कामे उरकून घेत असून, बि-बियाणांच्या खरेदी करण्यासाठी गडबड करु लागला आहे. त्यामुळे यासर्व बाबींचा गंभीर विचार करून केंद्र सरकारने दिलेल्या नियमांनुसार आपल्या जिल्ह्याला शिथिलती मिळावी अशी मागणी आ.सुरेश यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
Leave a comment