गेवराई । वार्ताहर
गेवराई येथील राशनच्या धान्य घोटाळ्या प्रकरणी आरोपी अरुण मस्के हा अद्यापही फरार आहे.त्याचा सुगावा काढण्यासाठी पोलिसांनी त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.राञी उशिरा पर्यंत या प्रकरणी त्याची चौकशी सुरु होती.
गेवराई शहरात पांढरवाडी रोडवर एका खाजगी गोदामात राशनचे धान्य बीड पोलिसांनी पकडला होता.या प्रकरणी अरुण मस्के यांच्या विरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागिल पाच ते सहा दिवसापासून मस्के हे फरार आहेत.या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी बीड पोलिसांनी एसआयटी पथक स्थापन केले आहे.तर दुसरीकडे तहसीलदार धोंडिबा गायकवाड यांनी देखील 40 जणांचे पथक विविध तपासणी साठी गेवराई तालुक्यात नियुक्त केले आहे.माञ अध्यापही या घोटाळ्याचा आरोपी याचा शोध लावण्यात या पथकांना यश आले नाही.या प्रकरणातील आरोपीचा भाऊ मोहन मस्के यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्याकडून त्यांच्या बंधूचा काही शोध अथवा थांगपत्ता लावण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या बंधूला ताब्यात घेतले असावे असे बोलले जात आहे.
Leave a comment