गेवराई । वार्ताहर
सध्या कडक उन्हाळा असल्याने पीकांना व पिण्यासाठी पाण्याची गरज असुन विुदुत भारनियमामुळे शेतक्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे भारनियमन कमी करण्यात यावे अशी मागणी उप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ गेवराई यांना दिलेल्या निवेदनात पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना गटनेते बापूराव चव्हाण यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उमापुर, गुळज, राक्षसभुवन या 33 केव्ही अंतर्गत येणार्या गावात फक्त सहा तास शेतकर्यांना वीज पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये लाईट फॉल्ट, गेवराई वरुन ड्रीपिंगमध्ये दोन तास लाईट जाते म्हणजे शेतीसाठी फक्त चार तास लाईट मिळते. या चार तासांमध्ये शेतकर्यांचे पाणी भरणे उरकत नाही. परिणामी पिके करपू लागली आहेत. पाणी उपलब्ध असून या विजेच्या भारनियमनामुळे ते पिकांना देता येत नाही शेतकर्यांची पिके करपून चालली असून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विद्युत भारनियमन कमी करून सहा तास ऐवजी आठ तासांचा वेळ शेतकर्यांना पिकांना पाणी देण्यासाठी देण्यात यावा अन्यथा आंदोलन शिवाय पर्याय राहणार नाही.
Leave a comment