प्रशासन व पत्रकार यांच्या मध्यस्तीने झाली सोय
धारूर । वार्ताहर
धारूर येथील गुरु राघवेंद्र जिनिंगवर काम करणारे कापूस कामगार मजूर येथे कुठलेही सोय होत नसल्याने तसेच जिणिग बंद पडल्याने आपल्या मुलाबाळाना घेवून पायीच गावाकडे निघाले होते. शहरापासून काही अंतरावर गेल्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेखा धस व पत्रकार अनिल महाजन, अतुल शिनगारे यांनी त्यांना रोखून आपण पायी एवढ्या दूर कसे जाणार जावू नका प्रशासनाच्या वतीने तुम्हीच गावी जाण्याची सोय केली जाईल सुरेखा धस यांनी तत्काळ तहसिलदार वंदना शीडोळकर यांच्याशी संपर्क साधून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने कामगार मजुरांना गावी जाण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न केले.
यामध्ये 36 मजूर कामगार तर 15 लहान बालके आहेत यात 10 दिवसाचा अगदी छोटा बालक आहे. एस टी महामंडळ याबाबत बसची सोय करून मध्य प्रदेशाच्या बाँड्रीवर सोडणार असल्याचे समजत आहे. आम्ही मध्यप्रदेश मधील आमच्या गावी पायी निघालो होतोत जीनींग बंद पडली खायला काही नाही गावात लोक येवू देत नाहीत प्रशासन आम्ही 2 मे रोजी मागणी करून देखील लक्ष देत नसल्याने गावाकडे पायी जात होतोत परंतु पोलीस व पत्रकार बांधवांनी आमची सोय केली आहे.
Leave a comment