नांदूरघाट । वार्ताहर
तालुक्यातील ऊसतोड मजुर स्वगृही परतले आहेत.त्यांना 14दिवसासाठी कॉरंटाइन करण्यात आले आहे.ऊसतोड मजुरांना किराणा साहित्य वाटप केले जाणार असे शासनाने जाहीर जाहीर केले असले तरी आज पर्यंत ऊसतोड मजुरांना किराणा साहित्य मिळाले नाही,ऊन वारा, वादळ,पाऊस असला तरी सरकारी निर्णयाचे पालन करत ऊसतोड मजुर काटेकोर पणे कॉरंटाइन चे पालन करत आहेत.त्यांच्या जवळचे राशन संपत आले होते,शासनाचे राशन अजून मिळाले नाही असा समजताच मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,केज तालुका अध्यक्ष कल्याण केदार,नारायण हांगे यांनी नांदूरघाट,मुंडेवाडी,हांगेवाडी,
या अगोदर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊसतोड मजुरांना राशन,भाजीपाला,पाणी साठवुन ठेवण्यासाठी टाक्यांचे वाटप केले आहे,लॉक डाऊन च्या काळा पासून गरजु गरीब नागरिकांना मदत करण्याचे कार्य मनसे च्या वतीने चालूच आहे जो पर्यंत लॉक डाऊन आहे तो पर्यंत विविध स्वरूपाचे मदत कार्य चालुच राहील ज्या नागरिकांना अडचणी आहेत,राशन ची आवश्यकता आहे त्यांनी तात्काळ माझ्याशी संपर्क करावा असे आव्हान मनसे चे बीड जिल्हा अध्यक्ष सुमंत धस यांनी केले आहे. मनसेचे तालुका उपाध्यक्ष गोरख तोगे,गोविंद हाके,नितीन बोराडे,संतोष सीरसट,राजेभाऊ धायगुडे, मुंडेवाडी चे तरुण नेतृत्व पोपटजी घोळवे,दरडवाडी मनसे शाखा अध्यक्ष डॉ आबा घोळवे, हंगेवादी चे तरुण विजय हांगे,विनोद हांगे,अमोल धनवे,राजेश ऊगलमुगले हे सर्व मनसे हात माणुसकीचा या उपक्रमात सहभागी होऊन जमेल तशी मदत गरजु नागरिकांना करत आहेत. या उपक्रमाला वेळ देऊन सहकार्य केल्या बद्दल सुमंत धस यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
Leave a comment