बीड । वार्ताहर
कोरोनाच्या संकटात आपला हातभार लागावा लोकांच्या मुखात अन्नाचा घास जावा यासाठी वैष्णोदेवीचे भक्त संतोष सोहनी यांनी आपल्या वैष्णो पॅलेस येथे गेल्या अनेक दिवसापासून अन्नदानाचा महायज्ञ सुरु केला आहे. सोमवारी चंपावती शाळेतील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षिका नलिनी अंबादास गोडसे यांनी वैष्णो पॅलेसला भेट देवून या सर्व उपक्रमाची माहिती जाणून घेतानाच संतोष सोहनींच्या या प्रेरणादायी उपक्रमाला 25 हजारांची मदत दिली. दरम्यान यावेळी त्यांनी संतोष सोहनींना सामाजिक कार्यासाठी भरभरुन आशिर्वाद दिला अन् त्यांचे कौतूकही केले.
वैष्णोदेवीचे भक्त संतोष सोहनी यांनी आपल्या वैष्णो पॅलेस येथे गेल्या अनेक दिवसापासून अन्नदानाचा महायज्ञ सुरु केला आहे.या ठिकाणी हजारो लोकांना दोनवेळचे जेवणदिले जातेय. यासाठी मित्र परिवारासह अनेकांची मोलाची साथ मिळत असताना सोमवारी अशी एक मदत मिळाली की ज्याची सर्वत्र चर्चा होती. चंपावती शाळेतील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षिका नलिनी अंबादास गोडसे यांनी प्रा.अनिल चरखा व सौ. सुजाता चरखा यांना सोबत घेऊन थेट वैष्णव पॅलेस गाठले आणि तेथे सुरु असलेला अन्नदानाचा महायज्ञ पाहुन त्या भाराऊन गेल्या. महान असे पुण्याचे हे कार्य पाहुन त्यांनी संतोष सोहनीचे तोंडभरुन कौतूक केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी संतोष सोहनीच्या महायज्ञाला 25 हजार रुपयाची मदत केली, संतोष सोहनी यांच्या डोक्यावर हात ठेऊन आशिर्वाद दिला. यावेळी उपस्थित सारेच सद्गतित झाले. आपण स्वत:हून इथे येवून मला आशिर्वाद देण्याबरोबरच मदतही केली, त्यामुळे मी धन्य झालो अशी भावना यावेळी संतोष सोहनी यांनी व्यक्त केली.
अनेकांच्या मुखात घास जाईल याचे समाधान
संतोष सोहनी यांच्या या अन्नदानातुन आज अनेक लोक तृप्त होत आहेत.मी थकल्याने धावपळ होत नाही. मदत करण्याची खुप दिवसापासून ईच्छा होती मात्र काय करावे हे सुचत नव्हते. मात्र सोहनी यांचे कार्य पाहुन मदत करण्याचे ठरविले.अनेकांच्या मुखात अन्नाचा घास जाईल याचे समाधान वाटत आहे अशी प्रतीक्रीया यावेळी नलिनी गोडसे यांनी दिली.
अनेकांच्या मदतीमुळेच महायज्ञ यशस्वी-संतोष सोहनी
तिसरे लॉकडाऊन सुरु आहे तरीही हा महायज्ञ सुरु आहे. आयुष्यभरात जी प्रेमाची माणस कमावली, मित्र परिवार सोबतीला आहे सर्वांची मोलाची साथ मिळत आहे.माता वैष्णोदेवीची कृपा आणि अनेकांच्या मदतीमुळेच हा अन्नदानाचा महायज्ञ चालू आहे.
Leave a comment