तलवाडा । वार्ताहर

जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून जनतेची सेवा करणार्‍या डॉक्टर, पोलिस कर्मचारी यांच्यावर फुलांचा वर्षाव करत राजापुर वसाहत येथील ग्रामस्थांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. यावेळी तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय शेख रियाज, तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश उणवने, सहाय्यक फौजदार मारोती माने तसेच त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यावर राजापूर वसाहत येथे  मधुसुदन महाराज गवारे यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सन्मान करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. 

डॉक्टर, पोलिस, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवडी सेविका, मदतनीस आदी कर्मचार्‍यांना पाई चालत त्यांच्यावर आपआपल्या घरासमोरून फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी डॉ.रियाज शेख, सपोनि सुरेश उणवने, ग्रामसेवक बी.टी. राठोड आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना डॉ.शेख म्हणाले की सोशल डिस्टन्स ठेवत स्वतःची काळजी घ्या व काही अडचण आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याला सेवा देण्यासाठी तत्पर आहे असे आवर्जून सांगितले. पोलिस मदतीची गरज पडल्यास निर्भिडपणे कळवा आम्ही तुमच्या सेवेत आहोत कधीही संपर्क करू शकता असे सपोनि सुरेश उनवणे म्हणाले. याप्रसंगी गावातील पत्रकार शेख मोहम्मद, उपसरपंच अजिनाथ सोनवणे, ग्रा.पं.सदस्य विठ्ठल गवते, सुभाष वायभासे, जालिंदर शेकडे, योगेश गर्जे, पोलिस बॉईज संघटनेचे शाखा अध्यक्ष कृष्णा गोरे, विनोद गोरे, ग्रामसुरक्षा रक्षक लक्ष्मण गवते, राम लोखंडे, विजय सांगळे, अशोक सांगळे, गणेश गर्जे, कल्याण लोखंडे, बाळू पालेकर, सतीश गोचदे, वसंत शेकडे, गोकुळ गर्जे, दादासाहेब गर्जे, अभिषेक गवते, अविनाश गवते, रामनाथ सिरसाठ,पिंटू सांगळे, दत्ता खंडागळे, आदित्य जाधव, अमोल जाधव, कादीर पठाण, शेख राजू, बाळु पटेकर, अजिनाथ नागरगोजे, विष्णु खंडागळे, पाशा शेख, सारंगधर भिंगले, देविदास शिरसाठ, आदी ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. शेवटी सर्व कर्मचार्‍यांनी युवकांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.