गेवराई । वार्ताहर

कोरोना सारख्या महामारीने आपल्या पुढे कठीण काळ उभा राहिला आहे. अशावेळी आपले आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे. त्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग तत्परतेने पुढे आलेला दिसतोय, त्यांचे डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी, सेवक दिवस रात्र काम करत आहेत. हे अवघड कार्य आहे. परंतू , सेवा धर्म महत्त्वाचा समजून काही अधिकारी स्वतःला झोकून देऊन काम करत आहेत. कोरोनाविरोधातील लढाईत अनेक अधिकारी आघाडीवर आहेत. त्यांची भूमिका वेग वेगळी असली तरी ध्येय मात्र एकच आहे. सध्या समाजाला आरोग्य सेवेची नितांत गरज आहे.नेमकी तीच देण्याचे काम जिल्हा प्रभारी व गेवराई तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम करत आहेत.

कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंधा साठी नियुक्ति झाल्यापासून तब्बल 46 दिवसांपासून डॉ.संजय कदम नीस्वार्थी भावनेतून काम करत आहेत. अत्यंत संयमी हसतमुख, कार्यतत्पर नेतृत्व मिळाल्याने हाताखालचे डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचारी अगदी जबाबदारीने काम करतांना दिसत आहे. जिल्हा प्रभारी व तालुकाआरोग्यअधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी खुप वाढली आहे. रोज सकाळी उठून ग्रामीण भागातील रुग्नाल्याशी कोरोना विषयीचे अपडेटस घ्यायचे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्ण या बाबतीत माहिती घ्यायची नंतर उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क करुण तालुक्यातील हालचाल व परिश्थितिची माहिती घ्यायची, होम कॉरनटाईन करायची, जन जागृति करायची अशी विविध कामे ते  वेळेत करत असल्याने त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. सध्या डॉ.कदम यांच्याकड़े शाहगड जवळील खामगांव चेक पोस्ट व महारटाकळी चेक़पोस्टचे मोनिटरिंग आहे. या चेकपोस्टवर इतर शहरातून, राज्यातुंन आलेल्या सर्व नागरिकांची तपासणी करने जिल्ह्यातील नागरिक असतील तर संबधित गावच्या सरपंचाना सांगुन त्यांना होम कॉरनटाईन करने बाहेर जिल्ह्यात जात असतील तर त्यांची तपासणी करने असे महत्वाचे काम करण्यासाठी खुप परिश्रम घेत आहेत. 

शहर, जिल्ह्यातील दवाखाने आणि वरिष्ठांशी समन्वय साधने, कोरोनाचे नियमित रिपोर्टिंग करने. त्याबाबतची माहिती एकत्र करने, संबधित यंत्रणांना ती उपलब्ध करुण देने. प्रसंगों ग्रामीण भागात क्षेत्रभेटी करने अशी कामे ही डॉ.कदम रोज करतात विशेष म्हणजे इतकी मोठी जबाबदारी असतांना ही ते ही जबाबदारी लील्या पेलतांना दिसतात. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना काही संदेश देता का अस विचारले असता ते म्हणाले की शासनाने जे लॉक डाऊन केले आहे त्याची अमलबजावनी करा, घरीच थाबा, बाहेरचा पाहुना आला तर तत्काळ सम्बंधित यंत्रनेना माहिती द्या वीनाकारण घराबाहेर पढूनका कारण आयुष्य घालवायचे हा विचार करू नका का?तर ती कोणी देंणगी दिली नाही...पुढे आयुष्य जगायचं ते ही आपल्या मार्जीने हे स्वप्न बघा हा मौलिक संदेश त्यांनी नागरिकांना दिला. संजय कदम सारखे डॉक्टर आपणास कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रात्रणदिवस जागता पाहारा देत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.