केज । वार्ताहर
केज येथील जुन्या पोलीस वसाहतीत अचानक अतिरीक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी भेट देऊन वसाहतीत राहणार्या पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच या वसाहतीत राहणार्या कर्मचार्यांना नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही करण्याचे सूचित केले.
केज येथील पोलीस कर्मचारी अत्यंत धोकादायक आणि जीर्ण झालेल्या व अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या पोलीस वसाहतीच्या घरात राहत आहेत. या बाबत प्रसार माध्यमांनी अनेकदा समस्यांचे वृत्त प्रकाशित केले आहे. दरम्यान दि.8 रोजी अंबाजोगाई विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर या केज येथे पोलीस दरबारसाठी आल्या होत्या. त्यांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी कोरोना विषाणू पासून बचाव करण्याचे व कर्त्याव्यवर असताना घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन केले. त्या नंतर अचानक पोलीस वसाहतीत जाऊन पडझड झालेल्या वसाहतीची पहाणी करून पोलीस कर्मचार्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच या ठिकाणी नवीन इमारत तयार झालेली असून केवळ वीज पुरवठा नसल्यामुळे स्थलांतर लांबले आहे. यामुळे पोलिसांच्या क्रयशक्ती व मानसिकतेवर देखील परिणाम होत असल्याचे त्यांना जाणवले. म्हणून त्यांनी या बाबत वरिष्ठ पातळीवरून कार्यवाही करून या नवीन इमारतीला तात्काळ विद्युत पुरवठा करून स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे सोबत पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन आणि पोलीस अधिकारी सोबत होते.
Leave a comment