गेवराई । वार्ताहर
शेतातून कापसाच्या पळाट्या आणण्यासाठी जात असलेल्या शेतकर्याच्या बैलगाडीवर विजेची तार पडल्थाने दोन बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. शेतकर्याने बैलगाडीतून उडी मारल्याने ते बचावले आहेत. घटना तालुक्यातील रामपूरी परिसरात घडली आहे.
रामकिसन आश्रुबा शिंदे हे रविवारी सकाळी शेतामध्ये बैलगाडी घेवून गेले होते. त्यांनी बैलगाडीत कापसाच्या पळाट्या आणायच्या होत्या. शेताकडे जात असतांना विजेची तार तुटून बैलगाडीवर पडली. यात दोन्ही बैलांना विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने बैल ठार झाले. शेतकर्यांने वेळीच गाडीतून उडी मारल्याने ते बचावले, या दुर्देवी घटनेत शेतकर्याचे मोठे नुकसान झाले. या घटने प्रकरणी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान घटनास्थळी महावितरणचे अभियंता वाणी यांनी भेट देवून पंचनामा केला आहे. महसूल विभागाला माहिती देण्यात आली असल्याचे समजते.
पोखरीत 2 बैल ठार
बीड तालुक्यातील पोखरी येथे वीज कोसळून एका शेतकर्याच्या दोन बैल ठार झाले आहेत. पोखरी या गावांमध्ये अवकाळी पावसाने एका शेतकर्याच्या दोन बैलाचा घात केला आहे. विजांच्या कडकडाटाने पडलेल्या पावसात एक वीज कोसळून पोखरी येथील आनंद काळे शेतकर्याचे दोन बैल जागीच ठार झाले.
Leave a comment