शहरी भागातील किराणा दुकाने बंद राहणार
बीड । वार्ताहर
किराणा अॅप व घरपोच डिलेव्हरीबाबत असलेला संभ्रम दुर करत शनिवारी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सुधारित आदेश जारी केले. त्यानुसार 13 मे पासून जिल्ह्यातील 11 शहरांमध्ये किराणा सामानाची संपूर्णपणे घरपोच सेवा सर्व किराणा दुकानदारांच्या सहाय्याने सुरू करण्यात येत असल्याचे संकेत दिले आहेत. तर ग्रामीण भागातील विषम दिनांकास संचारबंदीची सुट सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आली असून शहर भागातील वेळेत कोणताही बदल केलेला नाही.
किराणा दुकानदार व नागरिकांनी विनाशुक सेवा देणारे निडली होम डिलेव्हरी अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे खरेदी जास्तीत जास्त प्रमाणात करण्यात आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले होते. 13 तारखेपासून किराणाची घरपोच सेवा सुरू होणार असून त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबाळाची गरज लागणार आहे. ही घरपोच सेवा केवळ संचारबंदीच्या काळात पासधारक व्यक्तीमार्फत करता येणार आहे. दुकानदारांनी यासाठी नगर पालिका, नगर पंचायतमध्ये कर्मचार्यांची यादी सादर करून शिफारस पत्र मिळवावे. त्यानंतर वैयक्तिकरित्या प्रत्येक कर्मचार्यासाठी संकेतस्थळावरून पास मिळवावा. दुकानदारांनी नीडली अॅपद्वारे सेवा देताना व्हॉटस्अॅप किंवा मोबाईलवरूनही सेवा देण्याचा प्रयत्न करावा. परंतु नीडली अॅपच्या वापराला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कमीत कमी उत्पन्न असणार्या वस्त्यांमध्ये दुकानदारांनी ऑर्डरची किमान रक्कम निश्चित करून सेवा दिल्यास गरजू कुटुंबानाही फायदा घेता येईल. जिल्ह्यातील 11 शहरांमध्ये अ तिशय कमी उत्पन्न असणार्या वस्त्यांमधील किराणा दुकानदारांना सर्व ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी 17 मे पर्यंत विषम दिनांकास सकाळी 7 ते 9.30 दरम्यान दुकाने खुली ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र, शहरांमध्ये सर्वच भागात संमिश्र वस्त्या असतात. त्यामुळे कमी उत्पन्न कसे ठरवायचे असा संभ्रम किराणा व्यापार्यांमध्ये आहे. या संदर्भात प्रशासनाकडून मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. आदेशात म्हटले आहे की, भविष्यात अतिकठीण संकट काळात उपयोगी ठरावी म्हणून घरपोच सेवा अॅप पद्धतीचा जास्त वापर करावा. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सर्वच दुकानांना घरपोच सेवा देण्याबाबत प्रोत्साहित करावे. या शहरातील इतर दुकानदारांनाही टप्प्याटप्प्याने काही दिवसात याच पद्धतीने सामावून घेतले जाणार आहे.
Leave a comment