तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचे आवाहन

आष्टी । वार्ताहर

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर खरीप हंगामात शेतकर्‍यांनी सर्तक रहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.कोरोनाच्या सावटाखाली आपण खरीप हंगामाच्या उंबरठयावर सारे उभे आहेत.कोरानाचे दिर्घकालीन परीणाम शेती शेतकरी,अर्थकारण यावर दिसतील यात शंका नाही अशी स्थिती आहे. अशावेळी मिश्र व आंतरपिक पध्दतीचा अवलंब करावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

प्रसिद्धी पत्रकात सुपेकर यांनी म्हटले आहे, शेतकर्‍यांनी येत्या खरीप हंगामात एक पिक  ऐवजी बहुपिक पध्दतीचा अवलंब करावा.कडधान्य,तृणधान्य,गळितधान्य,चारापिके व भाजीपाला पिके यांचा समावेश पिक नियोजनात करावा. कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा .कडधान्ये म्हणजेच तुर, उडिद, मुग या पेरणी करीता सुधारीत जातीचे बियाणे वापरावे.बाजरी व मका या पिकांचे सुधारीत व संकरीत वाण वापरावेत. ज्या शेतकर्‍यांकडे स्वतःच्या शेतातील पिकवलेल्या तुर,मुग,उडिद व सोयाबीनचे बियाणे असेल त्यांनी स्वच्छ करुन उगवण क्षमता तपासून उत्तम उगवण क्षमता असणारे बियाणे बीजप्रक्रीया करुन पेरावे.मिश्र व आंतरपिक पध्दतीचा अवलंब करावा. पुरेसी ओल झाल्यानंतर पेरणी करावी.पिकांना पेरणी करताना योग्य ती रासायनिक खते पेरणी बरोबर दयावित. किडीचे व्यवस्थापन एकात्मीक किड व्यवस्थापन पध्दतीने करावे. हुमणी,लष्करी अळी , गुलाबी बोंडअळी या किडीचा जीवणक्रम समजुन घेवुन योग्य वेळी किडव्यवस्थापन उपाय योजावेत. निबोळीचा वापर करुन सुरुवातीच्या काळात किडीचे कमी किमंतीत व कमी खर्चात व्यवस्थापन करणे शक्य आहे. वेळोवेळी कृषि विदवापीठे कृषि विभाग,प्रगतशिल शेतकरी यांचे प्रसार माध्यमातुन प्रशिध्द होणा-या शेती विषयक संदेश आपल्या पिक संगोपनासाठी वापरावेत.शेतातील पिकांच्या किड व रोग स्वेक्षणावर भर दयावा व आवश्यकतेनुसार उपाययोजना कराव्यात. कमीत कमी खर्चात पिक घेण्यावर भर दयावा व खरीप हंगामात यशस्वी करावा शेतकरी गट , शेतकरी कंपन्या व कृषि निवौष्ठा विक्रेते यांनी परस्पर समन्वयातुन बियाणे,खते व किटकनाशके यांच्या खरेदीस्तव गर्दी न करता बांधावर या निवीष्ठा उपल्बध करणेस्तव प्रयत्नशिल रहावे असे आवाहन सुपेकर यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.