बीड । वार्ताहर
कोरोनाच्या संकटात बीड येथील कुटे ग्रुप, तिरुमला ऑईल नागरिकांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धावून आला आहे.जिओ जिंदगीच्या वतीने सुरू असलेल्या अन्नदान महायज्ञात तिरूमला ऑईलच्या वतीने पन्नास क्विंटल धान्य आणि अडीशे किलो तिरूमला खाद्यतेल जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
कोरोनाच्या संकटात सुरुवातीपासूनच कुटे ग्रुप तिरूमला ऑईलच्या व्यवस्थापकीय संचालक सौ.अर्चना सुरेश कुटे,आर्यन सुरेश कुटे हे सातत्याने मदतीसाठी सरसावले असून यापूर्वी आठ हजार कामगारांना तसेच गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे. कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा एकुण 20 लाखांचा मदत निधी देण्यात आलेली आहे.सामाजिक संस्थांच्या वतीने शहरात सुरू असलेल्या अन्नदानासाठी कुटे ग्रुपने मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. शनिवारी जिओ जिंदगीसाठी मदतीची गरज असल्याची माहिती मिळताच कु़टे ग्रुप तिरूमला ऑईलने पन्नास क्विंटल गहू आणि अडीचशे किलो तिरूमला खाद्यतेल जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्याकडे तिरूमला ऑईलचे राजकुमार आपेट, रवी तलबे यांनी सुपूर्द केले. यावेळी भास्कर ढवळे,संतोष ढाकणे,शाहिद पटेल,दादासाहेब मुंडे,भागवत तावरे, अविनाश वाघीरकर, दत्ता प्रभाळे आदींसह जिओ जिंदगीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a comment