बीड | वार्ताहर
बीड जिल्ह्यात शनिवारी पाठवलेले 23 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर आज रविवारी (दि.10) सकाळी 11 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले आहेत.
बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 9 तर केज उपजिल्हा रुग्णालयातून 2 जणांचे स्वॅब तपासणीला गेले आहेत,असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले.दरम्यान शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण तपासणी झालेले 319 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत.आजच्या 11 स्वॅबचा अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त होऊ शकतो.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment