बीड । वार्ताहर
बीड जिल्ह्यात शुक्रवारी पाठवलेले 9 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर शनिवारी (दि.9) सकाळी 23 जणांचे थ्रोट स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठवण्यात आले. ते सर्व निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
बीड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षातून 16 तर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातून 5 आणि परळी उपजिल्हा रुग्णालयातून 2 जणांचे स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले होते. सायंकाळी ते सर्व रिपोर्ट जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले. सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. दरम्यान आता शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण तपासणी झालेले 319 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. बीड जिल्ह्यात सध्या 94 जण होम क्वॉरंटाईनमध्ये तर 127 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
45 हजार मजुर जिल्ह्यात
राज्य शासनाने ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यास परवानगी दिली. त्यानंतर 19 एप्रिलपासून 9 मे पर्यंत एकुण 45 हजार 294 मजुर जिल्ह्याच्या विविध चेकपोस्टवरुन बीड जिल्ह्यात परतले आहेत.
Leave a comment