लॉकडाऊन संपेपर्यंत अन्नदान सुरू ठेवण्याचा द्वारकाधीशचा संकल्प

बीड । वार्ताहर

ज्याप्रमाणे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे साहेब शेवटपर्यंत अनाथ, वंचित, दिनदुबळ्या समाजासाठी, ज्या समाजाचा कोणी वाली नाही अशा घटकांसाठी कार्य करत राहिले, त्यांच्याच कार्याचा वारसा जपत भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश गुरखुदे व द्वारकाधीश मित्र मंडळाचे संस्थापक परशुराम गुरखुदे कोरोनाच्या या संकटात समाजासाठी एक पाऊल पुढे येत कार्य करत आहेत. नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असणारे गुरखुदे बंधू व त्यांचा मित्र परिवार मागील 40 दिवसांपासून रोज हजारो लोकांची भूक भागवत आहे. 

बीडमध्ये कोरोनाचा रुग्ण नसला तरी महाराष्ट्रात दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन शिथिल केला जात नसून लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत. लोकांकडे असणारी जमापुंजी आता संपत आली असून अश्या वेळेस द्वारकाधीश मित्र मंडळाच्या वतीने सुरू असणारा हा अन्नदानाचा महायज्ञ मात्र लोकांची भूक भागवून त्यांना या महामारीत दिलासा देण्याचे काम करत आहे. रोज सकाळी सात वाजल्यापासून या कार्याची सुरुवात होते. रोज दिडहजार लोकांसाठी स्वयंपाक तयार करणे व त्याचे डब्बे तयार करून ते घरोघरी पोहोचवणे यासाठी द्वारकाधीश मित्र मंडळाचे कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. त्यासोबतच रोज संध्याकाळी कोरोना योध्यासाठी म्हणजे पोलीस बांधवांसाठी नियमितपणे चहा दिला जात आहे. द्वारकाधीश मित्र मंडळाच्या या उपक्रमाबाबत लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतमताई मुंडे सातत्याने संपर्कात असून वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. तसेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, सुरेश नवले, आ.विनायकराव मेटे, मा.आ.अमरसिंह पंडित, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी कौतुक केले असून धोंडिराज महाराज पाटांगणकर, कौंडाण्य गुरुजी, जेष्ठ संपादक गंमत भंडारी, रा.स्व.संघाचे डॉ.सुभाष जोशी, डॉ.पी.के.कुलकर्णी, पत्रकार लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, महेश वाघमारे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले आहे. या अन्नदानाच्या महायज्ञात वैभव वैद्य, शेख आयाज, रोहित कुलकर्णी,आकाश जवकर, वैभव परभणीकर, गणेश काळे, सारंग खडकीकर, बंटी सेलमोकर, योगेश गुळवेलकर, जगदीश आनेराव, वैभव काळे,शुभम जाधव, बाबा मोमीन, शेखर, रोहित जव्हेरी, मंदार देशपांडे, रवि भोसले, नरेश गुरखुदे, सुस्कर, कुणाल जव्हेरी, बंटी शेटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आपल्या मेहनतीच्या रुपात समिधा अर्पण करत आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.