अंबाजोगाई । वार्ताहर

एकिकडे कोरोना आणि त्यामुळे झालेले लॉकडाऊन गोरगरीब, गरजू लोकांना मरण यातना देत आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनच्या मागील 42 दिवसांपासून एक देवदूत म्हणून प्रशांत शिंदे हे गरजूंना सर्वोतोपरी मदत करीत आहेत.

येथील दत्तकृपा मोबाईल शॉपी व मित्र परिवार यांच्याकडुन सामाजिक जाणिवेतून लॉकडाऊनच्या सुरूवाती पासून गेल्या 42 दिवसांपासून गोरगरिबांच्या मदतीसाठी विविध माध्यमातून सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. पोलीस बांधवांना मास्क, सॅनिटायझर वाटप केले. त्याच सोबत पोलिस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस बांधवांना व अत्यावश्यक सेवेत असलेल्या विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना मोफत चहा, पाणी, नाष्टा देणे तसेच गोरगरीब लोकांना भाजीपाला, अन्नधान्य वाटप करणे. शहरातील रस्त्यांवर फिरणार्‍या गरीब, गरजू, मनोरूग्ण यांना शोधून त्यांना खिचडी, पोहे, पोळी-भाजी, भोजन देणे हे कार्य आजतागायत सुरू आहे व लॉकडाऊन संपेपर्यंत हे सुरूच राहणार आहे असे हॉटेल अमरजाचे संचालक चंद्रकांत आबा शिंदे, दत्तकृपा मोबाईल शॉपीचे संचालक प्रशांत शिंदे यांनी सांगितले आहे. रकदान हेच जीवदान हे वाक्य डोळ्यांसमोर ठेवून प्रशांत शिंदे यांनी स्वता:हून रकदान देखील केले आहे. शिंदे यांच्या या कार्याला डॉ.धनाजी खाडे, अमित जाजू यांचे ही आर्थिक सहकार्य लाभले आहे. समाजात काही माणसे ही संकटाला घाबरणारी असतात. तर काही जण हे संकटातून मार्ग काढून यश मिळवणारी असतात. कोणता ही हेतू, स्वार्थ किँवा दृष्टिकोन डोळ्यांसमोर न ठेवता कोरोनाच्या संकटात निस्वार्थी भावनेने प्रशांत शिंदे यांचे सामाजिक कार्य सुरूच आहे. या लोककार्यात त्यांचे बंधू दिपक शिंदे, ईश्‍वर वाघमारे, दिपक गादेलवाड, नईम कुरेशी, अनिकेत थिटे, अक्षय परदेशी, ऋषिकेश आंधळे, पत्रकार अतुल जाधव, सय्यद सादेक, सौरभ चौधरी, योगेश सुकटे, निकी शाहू, साईराज देवकर, बापू कुडगर, सय्यद सोहेल यांचे सह प्रशांतदादा शिंदे मिञ मंडळाचे सहकार्य लाभत आहे. प्रशांत शिंदे यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासत केलेल्या कार्याचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.