चकलांबा । वार्ताहर
सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने माणुसकीचा हात या उपक्रमातंर्गत कोरोना पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यातील चकलांबा आणि परिसरातील वस्तीवर सुमारे 100 गरजु लाभार्थ्यांना जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि चकलांबा येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणार्या युवकांचा सहभाग होता.
मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते आणि चकलांबा गावचे भूमीपुत्र किसन रोकडे यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राात मोठे योगदान आहे. सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान चकलांबा, पुणे, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तींनी मोठे योगदान दिले आहे. किसन रोकडे यांनी कोरोना या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे. चकलांबा येथील भूमीपुत्र मुंबई येथे स्थायीक असलेल्या आनंद रोकडे, अनिकेत रोकडे, नाना रोकडे, किसन रोकडे, किरण रोकडे, बबन इंगावले, सुहास रोकडे, कैलास रोकडे, धर्मा रोकडे, ्रे्रआणि त्यांच्या सहकार्यांनी मुंबईहून खारीचा वाटा म्हणून चकलांबा गावातील गरजुंसाठी मदत पाठविली आहे.गेल्या महिन्यापासून चकलांबा येथे चार-पाच युवकांनी एकत्र येवून गरीब आणि गरजु नागरिकांना अन्यधान्य माणुसकीचा हात या उपक्रमाखाली मदतीसाठी कष्ट घेत आहेत.हातावर पोट असलेले आणि वयोवृध्द नागरिकांना हे तरुण युवक मदत करत आहेत. चकलांबा येथील अशोक गुंजाळ, अंकुश रोकडे, डी.डी. रोकडे, सतीष घाडगे,पांडुरंग इंगावले, अकाश खेडकर, सचिन भोसले, राहुल रोकडे, अमोल खेडकर, विनित छाजेड आदि गरजुंना मदत देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Leave a comment