माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रयत्नाला यश
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील सिमेंट रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे काही दिवसापूर्वी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन सोशल डिस्टन्स आणि नियमांचे पालन करत हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे असल्याचे निदर्शनात आणून दिले त्यानुसार प्रशासनाने या कामाला मंजुरी दिली असून आज पासून हे काम सुरू झाले आहे अशी माहिती नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे
बीड शहरासाठी नवीन 18 डीपी रस्ते मंजूर झालेले आहेत या रस्त्याची कामे सुरू असतानाच निवडणुका सुरू झाल्या आणि त्यानंतर हे काम थांबले,सध्या बीड शहरात भुयारी गटार योजना व अमृत अटल योजनेची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे हे काम ज्या ठिकाणी पूर्ण होत आहे त्याच ठिकाणचे रस्ते देखील पूर्ण करून घेतले जात आहे शहरासाठी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रयन्त करून नवीन 18 डी पी रस्त्यासाठी 88 कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत त्यानुसार शहरातील मुख्य रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत मात्र काही भागात ही कामे प्रलंबित होती काही दिवसांपूर्वी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची भेट घेऊन ही कामे पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे असल्याचे सांगितले होते,संचार बंदीचे नियम पाळत ही कामे करण्यास परवानगी देण्यात आली असून आजपासूनच ही कामे सुरू करण्यात असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर यांनी दिली आहे आता राहिलेली रस्त्याची कामे पूर्ण होणार आहेत
Leave a comment