मंठा । वार्ताहर
विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून जालन्याचे [मंठा] युवा नेते राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. काँग्रेसकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती, मात्र पक्षानं त्याऐवजी एका युवा नेत्याला संधी दिली आहे.. याबाबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार पक्षाचे जनरल सेक्रेटरी मुकूल वासनिक यांनी उमेदवारीचे पत्र दिले आहे.
या जागेसाठी अनेक नावे चर्चेत होती. पक्षाने काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय बंजारा समाजाच्या कुटुंबातील राजेश राठोड यांना उमेदवारी दिली असल्याने बंजारा समाज आनंद व्यक्त करीत आहे.
राठोड कुटुंब काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून राजेश राठोड यांचे वडील माजी आमदार धोंडीराम राठोड हे 2002 ते 2008 या कालावधीत राज्यपाल नियुक्त आमदार होते. तसेच त्यांनी पक्षाचे सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी, सचिव, महासचिव, भटक्या व विमुक्त जाती विभाग राज्य अध्यक्ष, आय. सी. सी. सदस्य, ऑल इंडिया काँग्रेस सदस्य तसेच सात राज्यात विधानसभा पक्ष पक्षीनिरीक्षक म्हणून काम केले आहे.
राजेश राठोड हे जिल्हा परिषदेत तीन वेळा निवडून आले असून ते जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती होते. तसेच त्यांनी पक्षाचे एन. एस. यु. आय. जिल्हा अध्यक्ष, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग
विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडनं अखेर राजेश राठोड यांच्या नावाला पसंती दिली आहे. विधानसभेवेळी काँग्रेसनं बंजारा समाजातल्या व्यक्तीला तिकीट दिलं नव्हतं, त्यामुळे यावेळी या समाजाला न्याय देण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया एका काँग्रेस नेत्यानं बोलताना व्यक्त केली आहे.
Leave a comment