अंबाजोगाई \ वार्ताहर
कोरोना सदृश्य परस्थिती लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने व स्व हेमंत राजेमाने बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सौजन्याने अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकारांना फेसशिल्ड मास्क भेट देण्यात आले.
सर्व जगासोबत जगातील सर्व पत्रकार बांधव ही आज कोरोना सदृश्य परस्थिती मधून मार्गक्रमण करत असल्याने पत्रकारांनी ही आपली सुरक्षितता ठेवून आपल्याच हाती आहे.हे ओळखले पाहिजे.त्या साठीच अंबाजोगाई शहरातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर व जिल्हा सरचिटणीस परमेश्वर गित्ते यांच्या पुढाकाराने अंबाजोगाई व परिसरात सामाजिक बांधिलकी डोळ्यांसमोर ठेऊन सतत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या स्व.हेमंत राजेमाने बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सौजन्याने अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकारांना फेसशिल्ड मास्क भेट देण्यात आले.या वेळी सोशल डिस्टन्सचा वापर करत संस्थेच्या वतीने उपनगराध्यक्ष बबनभैय्या लोमटे,नगरसेवक अनंतदादा लोमटे,सुनीलकाका लोमटे,रणजित लोमटे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष रवी किरण देशमुख,सचिव प्रवीण देशमुख, उपाध्यक्ष महेश लोमटे,राहुल उर्फ मुन्ना देशमुख, शरद लोमटे,भीमसेन लोमटे,सय्यद राजा, शैलेश चव्हाण,आप्पासाहेब कदम, प्रशांत मुंडे,अजित देशमुख,कपिल देशमुख, सौरभ कुलकर्णी यांच्या हस्ते उपस्थित सर्व पत्रकारांना फेसशिल्ड मास्क भेट दिले या वेळी बोलताना रविकिरण देशमुख यांनी संस्थेच्या सामाजिक उपक्रमाची माहिती देऊन कोरोना सदृश्य परस्थती मध्ये पत्रकार देत असलेल्या योगदाना मुळे स्व हेमंतराजे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकारांना फेसशिल्ड भेट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.या वेळी सर्व पत्रकारांच्या वतीने दत्तात्रय अंबेकर यांनी कोरोनाच्या या संकट समयी प्रसंगावधान राखून स्व.हेमंत राजेमाने बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पदाधिका-यांनी अंबाजोगाई शहरातील सर्व पत्रकारांना जे फेसशिल्ड मास्क भेट देऊन जे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले त्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने संस्थेचे आभार मानले.या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हा सहसचिव परमेश्वर गित्ते, स्थानिक अंबाजोगाई पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय दमकोंडवार, सचिव रणजित डांगे,तालुका पत्रकार संघाचे सचिव गोविंद खरटमोल यांच्यासह शहरातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने न.प व पोलीस
कर्मचा-यांना फेसशिल्ड मास्क वाटप
या वेळी स्व.हेमंत राजेमाने बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नगर परीषदेतील स्वच्छता कर्मचा-यांसाठी मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांना फेसशील्ड मास्क भेट देण्यात आले असुन संस्थेच्या वतीने बीड जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांच्या हस्ते शहर, ग्रामीण व बर्दापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा फेसशिल्ड मास्क वाटप करण्यात आले.यावेळी शहर पो.स्टेचे पो.नि सिद्धार्थ गाडे,ग्रामीणचे पो.स्टे.चे महादेव राऊत व बर्दापुर पो.स्टे. चे पो.उ.नि.शिंदे यांची उपस्थिती होती.
Leave a comment