गेवराई । वार्ताहर
कोरोना विषाणूचा बिमोड व्हावा म्हणून आपल्या स्तरावर सर्वजन प्रयत्न करत आहेत. सामाजिक दायित्व म्हणून आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ उद्योजक महावीर काला यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य सेवेत रुग्णांना उपयोगी पडणारे साहित्य भेट दिले आहे.
शुक्रवारी सकाळी अकरा वाजता रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश शिंदे यांची भेट घेऊन पल्स सॉक्स, ईटी ट्युब व एक व्हील चेअर रूग्णालयाला भेट म्हणून दिली आहे. गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथील उद्योजक महावीर काला यांचे वडील बाबुलालजी कच्चरदासजी काला यांचे वीस मार्च रोजी निधन झाले होते. त्यांची आठवण म्हणून काला परीवाराने येथील उपजिल्हा रुग्णालयाला पल्स सॉक्सचे 3 कीट, नवजात बालकांना उपयोगी येणार्या दहा ईटी ट्युब व एक व्हील चेअर भेट दिली आहे. यावेळी डॉ.राजेश शिंदे, डॉ. नोमाणी महमंद, डॉ.सराफ, डॉ.लेंडगुळे, मंगेश खरात यांची उपस्थिती होती. उद्योजक महावीर काला यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला आरोग्य सेवेत उपयोगी पडणारे साहित्य दिल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. समाजातील विविध घटकांना उपजिल्हा रुग्णालय सरकारी सुविधा देते. त्याशिवाय समाजातील दानशूर व्यक्तींनी रूग्णालयाला उपयोगी पडेल असे साहित्य दिले आहे. ही गोष्ट मनाला समाधान देणारी असल्याची प्रतिक्रिया रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राजेश शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
Leave a comment