आष्टी तालुक्यातील वाकी चेकपोस्टनजिकची दुर्देवी घटना
आष्टी । वार्ताहर
रात्रीच्यावेळी चेकपोस्टनजिकच्या पुलाजवळ ट्रॅक्टर थांबल्यानंतर खाली उतरताना महिलेला खाली पुल आहे की रस्ता हे समजू शकले नाही. खाली उतरताना ती महिला थेट नदीपात्रात कोसळली. पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झालेल्या त्या महिलेला मिरजगाव व नंतर अहमदनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी (दि.6) पहाटे ही घटना घडली.
सुमनबाई शेलार (48) मृत महिलेचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील वाकी येथील चेकनाक्यावर ही घटना घडली. ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी साखर कारखाने व प्रशासनाच्या मदतीने कायदेशीर पूर्तता केली जाते. चेकपोस्टवर आरोग्य तपासणी करून नागरिकांना त्यांच्या मूळगावी पाठवले जात आहे. बुधवारी पहाटे आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील ऊसतोड कामगार ट्रॅकटरद्वारे वाकी चेकपोस्टवर आले होते. चेकपोस्टनजीक सीना नदीवरील पुलावर वाहन थांबविण्यात आले होते. यावेळी रात्र असल्यामुळे पूल आहे? का जमीन आहे? हे न समजल्यामुळे ट्रॅक्टरखाली उतरलेली महिला थेट नदीच्या पात्रात कोसळल्याने तिच्या मणक्याला इजा झाली. तात्काळ तेेथील ग्रामस्थ व कर्मचार्यांनी जवळ असणार्या मिरजगाव येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले परंतु प्रकृती गंभीर असल्याने तात्काळ अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. दरम्यान गुरुवारी दुपारी सदरील ऊसतोड कामगार महिलेवर उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.
Leave a comment