आष्टी । वार्ताहर
परराज्यात जाणारे लोक हे काही पाकिस्तानी नाहीत.कोरोनामुळे किती जातील हा संशोधनाचा विषय आहे मात्र सरकारच्या समन्वयाच्या अभावाच्या कोरोनामुळेच माणसं आपला जीव गमावत आहेत हे दुर्देवी असून याला आमच्यासहीत सर्वच राजकारणी जबाबदार असून याचेच उदाहरण म्हणजे औरंगाबाद येथे रेल्वेखाली चिरडून मृत्यृमुखी पडलेले 16 नागरिक आहेत. कागदोपत्री घोडे नाचविण्यातच दिवस निघून जात असून प्रत्यक्षात कृती शून्य असल्याचे टिकास्त्र आ.सुरेश धस यांनी सोडले आहे.
कोरोनामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यातच परराज्यातील नागरिकांना जाण्यासाठी ठरविलेले सरकारी धोरण म्हणजे कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार आहे.त्यामुळे राज्यातले राज्यात परतताना सुद्धा या जिल्हाधिका-यांनी त्या जिल्हाधिका-यांना सांगत बसायच त्यातही आनलाईन असणारी यंञना कधी आफलाईन जाती याचा ताळमेळ नाही.शिवाय परराज्यात सोडण्यात येणार्या नागरिकांची वेगळीच व्यथा आहे.हे नागरिक म्हणजे काय पाकिस्तानी आहेत की काय? असा सवाल उपस्थीत होत असून आम्हा राजकारण्यांना काही लाज राहिली की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत असल्याचेही आ.धस शेवटी म्हणाले.
जागा मालकांनी भाडे माफ करावे
टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवेचे वगळता बरीच दुकानं बंद आहेत.त्यामुळे बंद असलेल्या दुकानांचे भाडे जागा मालकांनी घेऊ नये असे आवाहन गाळेमालकांना आ.सुरेश धस यांनी केले आहे.बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाडेतत्त्वावर दुकाने घेऊन युवकांनी उद्योग व्यवसाय सुरु केलेले आहेत. माञ कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेची किराणा,औषध विक्री करणारी वगळता इतर दुकानांना गेल्या दीड महिन्यापासून कुलूप आहे. बर्याच दिवसांपासून सर्वच व्यापार ठप्प असल्याने महिन्याचे भाडे देणे शक्य नाही.त्यामुळे ज्यांनी व्यासायासाठी गाळे भाडे तत्वावर दिले असतील त्या गाळेमालकांनी या युवकांचे ते भाडे माफ करावे. सध्याच्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीत कोणत्याही भाडेकरुंना दुकानभाड्यासाठी तगादा लावू नये. घरमालकांनी देखील भाडेकरुंकडून महिन्यांचे घरभाडे मागू नये असेही ते म्हणाले.
Leave a comment