आंटीसह घरमालकाविरुध्द गुन्हा
अंबाजोगाई । वार्ताहर
शहरातील महात्मा फुले नगरमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केला. दरम्यान दीन पीडितांचीही सुटका करण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई गुरूवारी (दि.7) रात्री उशीरा करण्यात आली.
या प्रकरणात लक्ष्मी शंकर मिसाळ (35) आणि घरमालक संजय बाबुराव झिरमिरे या दोघांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभागाच्या उपनिरीक्षक राणी सानप यांच्या फिर्यादीवरुन अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईदरम्यान दोन पीडित महिलांची सुटका करत त्यांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक परिसरात असलेल्या महात्मा फुले नगरमध्ये एका भाड्याच्या घरामध्ये कुंटनखाना सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षास मिळाली होती. त्यावरुन पथकाने या ठिकाणी छापा मारला. सुरुवातील त्यांनी दोन पोलिसांना डमी ग्राहक पाठवून शहानीशा केली. फोनवरुनच संभाषण करुन त्या महिलेने सर्व माहिती त्यांना दिली. त्या ठिकाणी गेल्यानंतर दोन महिला त्या महिले समोर उभ्या केल्या. डमी ग्राहक असलेल्या पोलिसांनी बाजूलाच असलेल्या पोलिसांना इशारा करताच छापा टाकण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, अप्पर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भारत राऊत, उपनिरीक्षक राणी सानप, सहाय्यक फौजदार शिवाजी भारती, पोह. प्रताप वाळके, पोह.भास्कर केंद्रे, सुरेखा उगले,सिंधु उगले, मीना घोडके,शेख शमीम पाशा, विकास नेवडे, सतिश बहिरवाळ, पो.शि.शेळके चालक सुस्कर यांनी केली.
Leave a comment