गेवराई । वार्ताहर

थुंकलेले चाटायची परंपरा आमच्या रक्तात नाही. गरिबांचे रेशन खाणारे आम्ही नाहीत. रेशन कोण खातयं हे सांगायची गरज नाही. या घाणेरड्या राजकारणाचा सोक्षमोक्ष आज ना उद्या लागणारच आहे. माझा पोलिस प्रशासनावर आणि न्यायदेवतेवर दृढ विश्वास आहे. भ्रष्टाचारी उघडे पडतील अशी भूमिका आमदार लक्ष्मण पवार यांनी जाहीर केली. अन्नधान्याचा काळाबाजार करणार्‍यांची साखळी उध्वस्थ केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, मग ते भाजपाचे असुदे नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आणखी कोणत्याही पक्षाचे, अशा कोणत्याही रेशन माफियांची गय करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

गेवराई येथील अरूण मस्केच्या गोडावूनमध्ये धान्याचा काळाबाजार करण्यासाठी अवैधरित्या साठा असल्याची माहिती मिळाल्या वरून पोलीस पथकाने सदरील ठिकाणी मंगळवारी रात्री अकरा वाजता गोदामावर छापा टाकला होता. या प्रकरणी पोलिस व तहसील प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली आहे. परंतु या प्रकरणाशी माझा संबंध जोडून आमचे विरोधक माझी नाहक बदनामी करत सुटलेत. गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गाने माझी बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कालच्या निवडणुकीत अनेक मार्गांचा अवलंब करून सुद्धा जनतेच्या आशीर्वादाने माझाच विजय झाला. त्यामुळे ही सगळी तडफड सुरू असून, माझी बदनामी केली जात आहे. गेल्या सहा सात वर्षापासून चुकीच्या गोष्टीवर अंकुश ठेवून, मी इमाने इतबारे काम करत आहे. मतदारसंघातील राशन व्यवस्था सुरळीत सुरू केली आहे. मला रेशन खायचे असते तर महिन्यात चार चार बैठका घेतल्या असत्या का? आणि जनतेला रेशन वाटप करण्याच्या संदर्भात कडक धोरण अवलंबले असते का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी पत्रकात म्हटले आहे की, ना रेशन खाल्ले, ना गुत्तेदाराकडून टक्केवारी घेतली. ना कधी सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना धमकी देऊन विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला. या पापात कधी पडलो नाही, पडणार ही नाही. जनतेची साथ आहे, तोपर्यंत भ्रष्टाचाराच्या पिलावळीविरूध्द लढतच राहील. आपण नेहमी प्रशासनाला सहकार्य केले आहे. कोणाला पाठीशी घालायचे आणि कधी कोणत्याही यंत्रणेवर दबाव आणायची प्रवृत्ती माझी नाही. त्यामुळे, या रेशन प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असेही आ.पवार यांनी म्हटले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.