बीड । वार्ताहर
कोरोना या साथ रोगाच्याप पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केले असल्यामुळे शाळा बंध आहेत.तथापी विद्यार्थ्यांनचे शिकणे सुरू राहावे यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार साहेबांच्या संकल्पनेतून वर्क फॉर्म होमच्या धर्तीवरस्कुल फॉर्म होम ही संकल्पना राबवली जात आहे. तर शिक्षण विभाग जि.प.बीड यांची निर्मिती असलेल्यामाझी शाळाया मोबाईल अँप्लिकेशनची निर्मिती अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे. केवळ 7 दिवसात 35 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षकमाझी शाळाया मोबाईल यॅप चा वापर करत आहेत.या सर्व उपक्रमाचा एक भाग म्हणून दि.10 मे 2020 रविवारी रोजी वैशिष्ट्य पूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. ही स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांना साठी खुली आहे.विध्यार्थ्यांनि घरी राहून चित्र काढतील,चित्र काढण्यासाठी ए-4 साईज पांढर्या कागदाचा वापर करावा, चित्र निर्मिती दिलेल्या विषयाला अनुसरून असावी,चित्र विहित मुदतीत पाठवणे अनिवार्य असेल. ही विद्यार्थ्यांनची परीक्षा नसून एक ज्ञान व मनोरंजनाची संधी आहे. क्रमांक निवडीसाठी जिल्हा स्तरावर तज्ञ परिक्षकांची समिती नियुक्त केली आहे. घरातच उपलब्द असलेल्या साहित्यातूनच साहित्याचा वापर करावयाचा आहे.कोणत्याही परिस्थितीत चित्रकलेची साहित्य खरेदीसाठी घराबाहेर पडू नये असेही सूचित केले आहे.
इयत्ता 1ली ते 5 विसाठी विषय: 1-कोरोना साथ रोगाचा उगम व लक्षणे याबाबत आपली संकल्पना 2-कोरोना रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना (खबरदारीचा उपाय), घरी घ्यावयाची काळजी. इयत्ता-6 वी ते 8 वि साठी विषय 1-कोरोना पार्श्वभूमीवर वापरल्या जाणार्या संकल्पना सोशल डीष्टन्स संचारबंदी, लॉकडाऊन, होम कॉरंटाईन इ.बाबत आपली कल्पना, 2-कोरोना या आजाराशी लढण्यासाठी विविध पातळीवर सुरू असलेल्या उपाय योजना बाबत या स्पर्धेत 164 केंद्रातील जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील यासाठी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सह शिक्षक यांनी विशेष पाठपुरावा करणे बाबत सूचित केले आहे. या चित्रकला स्पर्धेसाठी तालुका स्तरावर समन्वयकाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक केंद्रातून प्रत्येक वर्गाचे सर्व उत्कृष्ट एक चित्र(इयत्ता 1ली ते 8 वि प्रत्येक वर्गाचे, या प्रमाणे चित्र प्राप्त करने,प्राप्त केलेली सर्व चित्रे (प्रत्येक केंद्राचे 8 याप्रमाणे जिल्हा कार्यालयास नियुक्त केलेल्या तालुका समनवयकांनी दि.11 मे 2020 पर्येंत वॉट्सप वरती पाठवावीत त्यासाठी एक गुगल लिंक दिली जाणार आहे.
Leave a comment