केज । वार्ताहर
देशात लॉकडाऊन सुरू आहे. शिथिल काळात लोक अनावश्यक गर्दी करण्याचा प्रयत्न करत आहेत. केज शहरसह तालुक्यात शिथील कालावधी संपल्यानंतर तहसीलदार डी सी मेंडके यांचे पथक रस्त्यावर तैनात राहून गर्दी टाळण्याचे जनतेला आवाहन करत आहेत.
मास्क नसणे, विनाकारण फिरणे अशा रिकामटेकड्या लोकांना प्रसाद देऊन दंड करून तंबी देत आहेत. गुरुवार रोजी मुख्य रस्त्यावर फिरणार्या नागरिकांना पथकाकडून शिस्तीचे, नियमांचे धडे देण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळून इतरांनी बाहेर फिरू नये. मास्कचा वापर करावा. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा सूचना तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी जाऊन तहसीलदार यांचे पथक फिरत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकातील युवक जीव धोक्यात घालून सेवेचे कार्य करत आहेत. जनतेने स्वयंप्रेरणेने नियम पाळावेत असे आवाहन करण्यात आले.
Leave a comment