केज पोलिसांच्या निवासस्थानांची व्यथा
केज । वार्ताहर
केज पोलिसांना निवासासाठी दोन नवीन इमारती तयार झालेल्ल्या आहेत मात्र केवळ वीज पुरवठा नसल्यामुळे पोलीस कर्मचारी आणि यांच्या कुटूंबियांना जुन्या व जीर्ण इमारतीत रहावे लागत आहे.
केज येथील पोलीस वसाहतीच्या दोन इमारती या काही महीण्यापूर्वी तयार झालेल्या आहेत. यात वीस पोलीस कर्मचार्यांची व्यवस्था होणार आहे. प्राधान्याने जे सध्या जुन्या वसाहतीत राहतात त्यांना नवीन इमारतीत घर मिळणार आहे. जुनी पोलीस वसाहतीची अवस्था खुप वाईट असून दरवाजे खिडक्या तुटलेल्या आहेत. भिंतींना तडे गेलेले असुन प्लँस्टर निखळलेले आहे. अनेक इमारतींचे छताचे प्लँस्टर डोक्यात पडत आहे. या ठिकाणच्या नाल्या तुंबलेल्या असून निचरा न झाल्यामुळे दुर्गंधी येत असल्याने भटकी कुत्री, डुकरे व गाढवांचा मुक्त संचार आहे. तरीही कर्मचार्यांना नाविलाजने जुन्या वसाहतीत राहणार्या पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या आरोग्याला घोका निर्माण होत आहे मात्र केवळ नाविलाज म्हणून अनेकजण येथे राहतात. या प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाने व अधिकारी वर्गाने याची तात्काळ दखल घेऊन नवीन वसाहतीत वीज पुरवठा जोडून देण्याची मागणी पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आधीच कोरोना विषाणूमुळे बंदोबस्तावर असलेले कर्मचारी हे प्रचंड ताणतणावात असताना पुन्हा या राहण्याच्या प्रश्नामुळे त्यांच्या मानसिक ताण तणाव काढत आहेत.
Leave a comment